शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Gold Rates: आठवड्याभरात सोने कितीने महागले? जाणून घ्या ताजा दर

By ऑनलाइन लोकमत | Published: December 05, 2020 2:25 PM

1 / 10
कोरोना काळात पुढे ढकलावी लागलेली लग्नसराई, दिवाळी आदीमुळे सध्या सोन्याच्या खरेदीत वाढ दिसत आहे. परंतू सोन्याच्या दरात मोठा चढउतार पहायला मिळत आहे. शेजारच्याला ४८००० हजाराने मिळालेले सोने दुसऱ्या दिवशी जाताच ४९००० वर गेलेले दिसत आहे.
2 / 10
सोन्याच्या किंमतीत (price of gold) शुक्रवारीही घसरण नोंदविली गेली. मात्र, गेल्या आठवड्याच्या तुलनेत या आठवड्याचा विचार केला तर सोन्याचे दर वाढलेलेच दिसतील.
3 / 10
एमसीएक्सवर फेब्रुवारीला देय असलेल्या सोन्याच्या किंमतीत ९३ रुपयांची घट झाली. शुक्रवारी बाजार बंद होताना सोन्याचा दर हा ४९२०९ रुपये प्रति १० ग्रॅम होता.
4 / 10
असे असले तरीही आठवडाभरात सोन्याच्या दरात १२०० रुपयांची वाढ झाली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात देखील सोन्याची स्थिती अशीच दिसून आली.
5 / 10
जाणकारांनुसार डॉलरच्या दरात घसरण झाल्याने या आठवड्यात सोन्याचे दर वाढले आहेत. अमेरिकेत स्टिम्युलस पॅकेज जाहीर केले जाण्याची शक्यता आहे. यामुळे पुढील काळात बाजारात सोन्याचे दर हे ४८००० ते ५०००० च्या आत राहण्याची शक्यता आहे.
6 / 10
ऑगस्टमध्ये सोन्याच्या दराने ५६३०० रुपयांचा पल्ला गाठला होता. मात्र, आतापर्यंत त्यात ७००० रुपयांची घट झाली आहे.
7 / 10
शुक्रवारी आरबीआयने आर्थिक वर्षात जीडीपीचा अंदाज वर्तविल्याने सोन्य़ावर दबाव वाढला होता. महागाई वाढल्याने आरबीआयने रेपो दरात कोणतीही वाढ केली नाही. भारत आपल्य़ा गरजेचे सोने हे आयातच करतो. यातच डॉलरच्या तुलनेत रुपया १३ पैशांनी वधारल्याने ७३.८० च्या स्तरावर गेला होता.
8 / 10
कोरोना काळात सोन्यावर गुंतवणूकदारांच्या उड्या पडल्या. भारतात ऑक्टोबर, नोव्हेंबर हा महिना सण, उत्सवांचा होता. यामुळे सोन्याच्या किंमती वाढण्याची शक्यता होती. मात्र, लॉकडाऊन आणि कोलमडलेली अर्थव्यवस्था यामुळे खरेदीदारांनी सोने खरेदीकडे पाठ फिरवली. यामुळे सोन्याची चमक अचानक गायब होऊ लागल्याचे दिसत आहे. नोव्हेंबरमध्ये सोने २६०० रुपयांहून स्वस्त झाले आहे. तर उच्चतम स्तरावरून सोने ४००० रुपयांनी स्वस्त झाले आहे.
9 / 10
जसजशी कोरोना लस बनविण्याच्या आशा आणि तयारी सुरु झाली आहे, तसतशी ती लोकांपर्यंत पोहोचविण्याच्या शक्यताही वाढू लागल्या आहेत. यामुळे सोन्याच्या दरात त्या प्रमाणात घट दिसणार आहे. तज्ज्ञांच्या मतानुसार फेब्रुवारी २०११ पर्यंत सोन्याचे दर हे ४२००० रुपये प्रति १० ग्रॅमवर जाण्याची शक्यता आहे. याचबरोबर चांदीच्या दरातही घट दिसण्याची शक्यता आहे. कारण याचकाळात कोरना लसीचा पहिला टप्पा वितरण आणि लसीकरण होण्य़ाची शक्यता आहे.
10 / 10
पुढील वर्षाच्या सुरुवातीला म्हणजेच जानेवारी, फेब्रुवारीमध्ये सोन्याच्या किंमती घसरण्याची (Gold Price down) आशा व्यक्त केली जात आहे. २०२१ च्या सुरुवातीला सोने 42,000 प्रति ग्रॅम होण्याची शक्यता आहे. असे का होईल? याच्यामागे अनेक कारणे आहेत. मात्रस सर्वात मोठे कारण हे कोरोना आणि त्याला रोखण्यासाठी बनविण्यात येत असलेली लस हे आहे.
टॅग्स :Gold Spot Exchangeगोल्ड स्पॉट एक्स्चेंजGoldसोनं