शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Gold Rates Today : सोन्या-चांदीत पुन्हा तेजी, सोन्यानं ७३ हजारांचा टप्पा ओलांडला; काय आहेत दर? पाहा

By ऑनलाइन लोकमत | Published: June 06, 2024 12:25 PM

1 / 6
Gold Rates Today : एकीकडे शेअर बाजारात जोरदार चढउताराचं वातावरण दिसून येतंय तर, दुसरीकडे कमोडिटी मार्केटमध्येही संमिश्र व्यवसाय पाहायला मिळात आहे. पण सोन्या-चांदीमध्ये पुन्हा एकदा तेजी दिसून येत आहे. या आठवड्यात हळूहळू पण पुन्हा सोन्या-चांदीच्या दरात वाढ होतेय.
2 / 6
भारतीय वायदा बाजारातही गुरुवारी सोन्याच्या दरात वाढ झाली आहे. एमसीएक्सवर आज सकाळी सोन्याचा भाव ४३२ रुपयांनी (०.६%) वाढून ७२,९५० रुपये प्रति १० ग्रॅम झाला. बुधवारी अमेरिकी डॉलरच्या तुलनेत सोनं ७२,५१८ वर बंद झालं होतं. त्याचबरोबर चांदीमध्येही चांगली वाढ झाली. एमसीएक्सवर आज चांदी १३३५ रुपये म्हणजेच १.४८ टक्क्यांनी वधारून ९१,७७९ रुपये प्रति किलो झाली आहे. कालच्या व्यवहारात चांदी ९०,४४४ वर बंद झाला.
3 / 6
आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील सोन्या-चांदीच्या दरात वाढ होताना दिसत आहे. यूएस स्पॉट आणि फ्युचर्स गोल्डमध्ये वाढ झाली आहे. किंबहुना आर्थिक आकडेवारी पाहता सप्टेंबरमध्ये व्याजदरात कपात होण्याची अटकळ पुन्हा सुरू झाली असून, डॉलर निर्देशांक आणि बॉन्ड यील्डमधील कमकुवतपणामुळे सोन्याच्या दरात वाढ झाली आहे.
4 / 6
कॉमेक्सवर स्पॉट गोल्ड ०.८ टक्क्यांनी वधारून २,३७३.३१ डॉलर प्रति औंस वर व्यवहार करत होते. अमेरिकेतील सोन्याचा वायदा भाव ०.७ टक्क्यांनी वधारून २,३९२.८० डॉलर प्रति औंस झाला.
5 / 6
जागतिक बाजारातील घसरणीमुळे बुधवारी राष्ट्रीय राजधानी दिल्लीत सोन्याचा भाव ८० रुपयांनी घसरून ७२,८२० रुपये प्रति १० ग्रॅम झाला. मागील सत्रात सोन्याचा भाव ७२,९०० रुपये प्रति १० ग्रॅम वर बंद झाला होता. चांदीचा भावही १,२०० रुपयांनी घसरून ९१,९०० रुपये प्रति किलो झाला होता. मागील सत्रात चांदी ९३,१०० रुपये प्रति किलोवर बंद झाली होती.
6 / 6
एचडीएफसी सिक्युरिटीजचे वरिष्ठ विश्लेषक-कमोडिटीज सौमिल गांधी म्हणाले, 'अमेरिकन डॉलर मजबूत झाल्यानं आणि तांत्रिक विक्रीच्या दबावामुळे सोन्याच्या दरात घसरण झाली. यामुळे अमेरिकन फेडरल रिझर्व्ह लवकरच व्याजदरात कपात करेल, अशी अपेक्षा बळावली आहे.'
टॅग्स :GoldसोनंSilverचांदी