शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Gold-Silver Price Today : सोन्या-चांदीच्या दरात घसरण; विक्रमी उच्चांकावरून सोने 4000 रुपयांनी स्वस्त, जाणून घ्या 10 ग्रॅमचा भाव

By ऑनलाइन लोकमत | Published: August 08, 2022 12:49 PM

1 / 7
नवी दिल्ली : आज आठवड्याच्या पहिल्या व्यवहाराच्या दिवशी सोन्या-चांदीच्या दरांमध्ये (Gold-Silver Rate) मोठा बदल झाला आहे. रिझर्व्ह बँकेने रेपो दरात वाढ केल्यामुळे भारतीय बाजाराचा कल बदलला आहे. दुसरीकडे, जागतिक बाजारातून मिळणारे संकेत पाहिले तर सोन्या-चांदीच्या दरात बदल दिसून येत आहे.
2 / 7
जागतिक बाजारातील घसरणीमुळे सोमवारी सकाळी भारतीय वायदे बाजारात सोन्या-चांदीच्या दरातही चढ-उतार दिसून आला. आज जिथे सोन्याचा भाव 52 हजारांच्या खाली आला आहे, तिथे चांदी 57 हजारांच्यावर पोहोचली आहे.
3 / 7
मल्टीकमोडिटी एक्सचेंजवर (MCX) सकाळी 24 कॅरेट शुद्ध सोन्याची वायदा किंमत 30 रुपयांनी घसरून 51,844 रुपये प्रति 10 ग्रॅमवर ट्रेड करत आहे, तर चांदी 50 रुपयांनी वाढून 57,414 रुपयांवर ट्रेड करत आहे. मात्र, त्याआधी सोन्याचा व्यवहार 51,793 रुपयांच्या स्तरावर सुरू झाला, तर चांदीची 57,398 रुपयांच्या पातळीवर सुरुवात झाली. दरम्यान, सोन्याचा भाव सध्या मागील बंद किमतीपेक्षा 0.06 टक्‍क्‍यांनी घसरत आहे, तर चांदीचा भाव वधारत आहे आणि मागील बंद किमतीपेक्षा 0.09 टक्‍क्‍यांनी वाढ होऊन व्यवहार करत आहे.
4 / 7
आज जागतिक बाजारात सोन्या-चांदीच्या दरात घसरण झाली आहे. एकीकडे रशिया-युक्रेन तणावामुळे सोन्याच्या किमतीवर दबाव आहे. अमेरिकन बाजारात आज सोन्याची स्पॉट किंमत 1,772.72 डॉलर प्रति औंस आहे, तर चांदीची स्पॉट किंमत 19.88 डॉलर प्रति औंस आहे. म्हणजेच, सोन्या-चांदीचे दर मागील बंद किंमतीपेक्षा खाली जात आहेत.
5 / 7
सोने आपल्या विक्रमी उच्चांकावरून 4,000 रुपयांनी स्वस्त मिळत आहे. जर आज MCX च्या वायदा किमतीशी 24 कॅरेट सोन्याच्या किमतीच्या तुलनेत याच्या सर्वकालीन उच्च किंमतीशी तुलना केली, तर सोने आपल्या विक्रमी उच्च मूल्यापेक्षा खूपच स्वस्त विकले जात आहे. दरम्यान, सोन्याचा उच्चांक 56,200 रुपये आहे.
6 / 7
जर तुम्हाला आता सोन्याची शुद्धता तपासून पाहायची असेल तर यासाठी सरकारकडून एक अ‍ॅप तयार करण्यात आले आहे. 'बीआयएस केअर अ‍ॅप' (BIS Care app) च्या माध्यमातून तुम्ही सोन्याची शुद्धता तपासू शकता.
7 / 7
या अ‍ॅपद्वारे तुम्ही केवळ सोन्याची शुद्धताच नाही तर त्यासंबंधात तक्रार देखील करू शकता. या अ‍ॅपमध्ये परवाना, नोंदणी आणि हॉलमार्क क्रमांक चुकीचा आढळल्यास ग्राहक त्वरित तक्रार करू शकतात. या अ‍ॅपच्या माध्यमातून ग्राहकांना त्वरित तक्रार नोंदविण्याची माहितीही मिळेल.
टॅग्स :businessव्यवसायGoldसोनंSilverचांदी