शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Gold Silver Price Drop: टॅक्स कपात केल्यानंतर सोनं ४ हजार रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२९९ ने घसरली

By ऑनलाइन लोकमत | Published: July 24, 2024 1:57 PM

1 / 7
Gold Silver Price: सोनं-चांदी खरेदी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. काल केंद्रीय मंत्री निर्मला सीतारमन यांनी सोनं आणि चांदीवरील टॅक्स कपात करण्याची घोषणा केली. यामुळे आता सोनं आणि चांदीच्या दरात मोठी घसरण झाली आहे.
2 / 7
Gold Silver Price: आज बुधवारी म्हणजेच अर्थसंकल्पाच्या दुसऱ्याच दिवशी सोन्याच्या दरात चार हजार रुपयांची घसरण झाल्याचे पाहायला मिळाले. आज सराफा बाजारात २४ कॅरेट सोन्याचे दर ६९१९४ रुपये प्रति १० ग्रॅमवर ​​आला आहे. तर, चांदी ८४८९७ रुपये प्रति किलो दराने उघडली.
3 / 7
मंगळवारी केंद्रीय अर्थसंकल्पानंतर एका झटक्यात सराफा बाजारात सोने ३६१६ रुपये प्रति १० ग्रॅमने स्वस्त झाले. तर चांदी ३२७७ रुपये प्रतिकिलो दराने घसरली.
4 / 7
IBJA नुसार, आज २४ कॅरेट सोन्याचा भाव ४०८ रुपयांनी घसरून ६९१९४ रुपये प्रति १० ग्रॅम झाला आहे. तर २३ कॅरेट सोन्याचे दरही ४०६ रुपयांनी घसरून ६८९१७ रुपये प्रति १० ग्रॅम झाला आहे.
5 / 7
२२ कॅरेट सोन्याचा दरही ३७३ रुपयांनी घसरून ६३३८२ रुपयांवर आला असून १८ कॅरेट सोन्याचा दर ३०६ रुपयांनी स्वस्त होऊन ५१८९६ रुपये प्रति १० ग्रॅम झाला आहे.
6 / 7
१४ कॅरेट सोन्याचा दरही २३८ रुपयांनी स्वस्त होऊन ४०४७९ रुपये प्रति १० ग्रॅम झाला आहे. चांदीच्या दरात आज फक्त २२ रुपयांची घसरण झाली आहे. आज चांदी ८४८९७ रुपये प्रति किलोवर उघडली.
7 / 7
अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मंगळवारी त्यांच्या अर्थसंकल्पीय भाषणात सोने आणि चांदीवरील कस्टम ड्युटी १०% वरून ६% पर्यंत कमी करण्याची घोषणा केली. याचा परिणाम सराफा बाजारावरही झाला. दोन दिवसांत सोने सुमारे ४०२४ रुपयांनी तर चांदी ३२९९ रुपयांनी स्वस्त झाली आहे.
टॅग्स :GoldसोनंSilverचांदी