शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Gold Silver Price: सोन्याच्या दरात घसरण कायम, २ आठवड्यात सर्वात निच्चांकी नोंद; जाणून घ्या आजचा दर...

By ऑनलाइन लोकमत | Published: September 01, 2021 12:14 PM

1 / 9
डॉलरच्या तुलनेत रुपया वधारल्यानं भारतीय बाजारात आजही सोन्याच्या दरात घसरणीची नोंद झाली आहे. एमसीएक्सवर ऑक्टोबरसाठीच्या वायदा दरात सोन्याचा भाव ०.०८ टक्के घसरणीसह नोंदवला गेला आहे. सलग तिसऱ्या दिवशी सोन्याच्या दरात घसरण झाली आहे.
2 / 9
चांदीच्या सप्टेंबरसाठीच्या वायदा दरात मात्र वाढ झाल्याचं पाहायला मिळत आहे. चांदीच्या दरात ०.१३ टक्के वाढ नोंदविण्यात आली आहे.
3 / 9
रुपयाच्या मजबूतीमुळे सोन्याची आयात करणं काही प्रमाणात स्वस्त झालं आहे. याचाच परिणाम सोन्याच्या दरावर झालेला पाहायला मिळत आहे. त्यामुळे सोनं खरेदी करण्यांसाठी उत्तम संधी उपलब्ध झाली आहे.
4 / 9
एमसीएक्सवर ऑक्टोबरसाठीच्या वायदा बाजारात सोन्याचा दर ३६ रुपयांनी घसरून प्रति १० ग्रॅमसाठी ४७ हजार ८४ रुपये इतकी नोंदविण्यात आली आहे. डॉलर इंडेक्समध्ये चढ-उतार पाहायला मिळत असल्यानंच आंतरराष्ट्रीय बाजारात मंगळवारी सोनं-चांदीच्या दरातही चढ-उतार पाहायला मिळत आहेत.
5 / 9
चांदीच्या सप्टेंबरसाठीच्या वायदा दरात ८३ रुपयांच्या मजबुतीसह प्रतिकिलो ६२ हजार ९९९ हजार रुपये इतका ट्रेंड होत आहे.
6 / 9
दिल्लीच्या सराफा बाजारत सोन्याचा दर १०० रुपयांनी घसरून प्रति १० ग्रॅमसाठी ४६ हजार २७२ रुपये इतका आहे. काल हाच दर ४६ हजार ३७३ रुपयांवर बंद झाला होता.
7 / 9
चांदीच्या दरात १३४ रुपयांची घट होऊन प्रतिकिलो ६२ हजार ६३९ रुपये इतका झाला आहे. काल हाच दर ६२ हजार ७७३ रुपये इतक्या स्तरावर बंद झाला होता.
8 / 9
सॉवरेन गोल्ड बॉन्ड स्कीम अंतर्गत सहाव्या सीरीजला देखील सुरुवात झाली आहे. याअंतर्गत ३ सप्टेंबर २०२१ पर्यंत गुंतवणूक करता येणार आहे. सॉवरेन गोल्ड बॉन्डची इशू प्राइज ४,७३२ रुपये प्रतिग्रॅम इतकी निश्चित करण्यात आली आहे.
9 / 9
सॉवरेन गोल्ड बॉन्डसाठी ऑनलाइन पद्धतीनं अर्झ करणाऱ्यांसाठी ५० रुपयांची सूट देखील सरकार देणार आहे. ऑनलाइन किंवा डिजिटल पेमेंट करणाऱ्यांना प्रतिग्रॅम ५० रुपये सूट मिळणार आहे. अशापद्धतीनं तुम्ही १० ग्रॅम सोन्यावर ५०० रुपयांपर्यंतची सूट मिळवू शकता.
टॅग्स :GoldसोनंSilverचांदी