gold silver price today on 23 june 2021 gold prices today near 2 month lows
Gold Price Today: सोन्याचा आजचा भाव दोन महिन्यांतील निचांकी पातळीवर, जाणून घ्या लेटेस्ट दर... By ऑनलाइन लोकमत | Published: June 23, 2021 11:52 AM1 / 8गेल्या दोन दिवसांपासून सोन्याच्या दरात वाढ होत असल्याचं दिसून येत असलं तरी मल्टी कमोडिटी एक्स्चेंजवर (MCX) सोन्याचा दर गेल्या दोन महिन्यांतील निचांकी पातळीवर पोहोचला आहे. 2 / 8आज सलग तिसऱ्या दिवशी एमसीएक्सवर सोन्याच्या दरात तेजी पाहायला मिळाली. त्यामुळे ऑगस्टच्या वायदा दरात सोन्याची किंमत ०.१४ टक्क्यांनी वाढ झाली आहे. तर ऑगस्टसाठीच्या चांदीच्या वायदा दरात ०.४२ टक्क्यांची उसळी पाहायला मिळत आहे. 3 / 8MCX वर आज सोन्याच्या दरात ६५ रुपयांची वाढ होऊन ४७ हजार ७६ रुपये इतका झाला आहे. तर आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या किंमतीत ०.१ टक्क्यांची वाढ होऊन प्रति औंस १,७८०.०६ डॉलर इतका झाला आहे. 4 / 8सोन्याच्या दरात गेल्या आठवड्यात सातत्यानं घसरण होत होती. पण या आठवड्यात गेल्या दोन दिवसांपासून सोन्याच्या दरात पुन्हा एकदा तेजी प्राप्त झाल्याचं पाहायला मिळत आहे. 5 / 8गेल्या आठवड्यात गुरुवारी आणि शुक्रवारी केवळ दोन दिवसांत १६०० रुपयांची घसरण झाली होती. 6 / 8चांदीच्या दरातही आज २८६ रुपयांची वाढ झाल्याचं पाहायला मिळत आहे. चांदीचा आजचा भाव प्रतिकिलो ६७ हजार ८०१ रुपये इतका झाला आहे. 7 / 8चांदीचा आजवरचा उच्चांकी स्तर प्रतिकिलो ७९ हजार ९८० रुपये इतका होता. त्यामुळे सध्या चांदीच्या दरात उच्चांकी पातळीपेक्षा जवळपास १२ हजार ६०० रुपयांची घट झाली आहे. 8 / 8देशभरात १६ जूनपासून सोन्याच्या दागिन्यांची विक्री करताना त्यावर हॉलमार्क असणे बंधनकारक करण्यात आले आहे. या नियमानुसार, आता १४, १८ आणि २२ कॅरेटच्या सोन्याच्या दागिन्यांवर हॉलमार्क असेल तरच त्यांची विक्री करता येईल. आणखी वाचा Subscribe to Notifications