शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Gold-Silver Rate: जन्माष्टमीच्या दिवशी सोन्याच्या दरात मोठी घसरण, जाणून घ्या लेटेस्ट दर...

By ऑनलाइन लोकमत | Published: August 30, 2021 11:45 AM

1 / 9
कृष्ण जन्माष्टमीच्या (Krishna Janmashtami 2021) पार्श्वभूमीवर सोनं आणि चांदीच्या दरात आज घट झाल्याचं पाहायला मिळत आहे. त्यामुळे सोनं खरेदी करणाऱ्यांसाठी आजचा दिवस चांगला आहे.
2 / 9
डॉलरच्या तुलनेत रुपया मजबूत झाल्यानं आणि जागतिक बाजारपेठेतील सकारात्मक वातावरणामुळे सोनं, चांदीच्या किमतीत घट झाली आहे. मल्टी कमॉडिटी एक्स्चेंजवर (MCX) सोन्याच्या ऑक्टोबरसाठीच्या वायदा दरात ०.२९ टक्के घट नोंदविण्यात आली आहे.
3 / 9
रुपयाच्या दरात आज वाढ झाली आहे. अमेरिकन डॉलरच्या तुलनेत रुपया ३१ पैशांनी मजबूत होऊन ७३.३८ रुपयांवर पोहोचला आहे. त्यामुळे सोन्याची आयात स्वस्त झाली आहे.
4 / 9
एमसीएक्सवर ऑक्टोबरसाठीचा सोन्याचा भाव १३७ रुपयांनी कमी होऊन ४७,४०१ रुपये प्रति १० ग्रॅमवर आले आहेत.
5 / 9
यासोबतच चांदीच्या सप्टेंबरसाठीच्या वायदा दरात १०५ रुपयांची घट नोंदविण्यात आली आहे. चांदी प्रतिकिलो ६३,४८० रुपये इतक्या रुपयांवर ट्रेंड होत आहेत.
6 / 9
सॉवरेन गोल्ड बाँड योजनेच्या सहाव्या सीरिजची सुरुवात देखील आजपासून सुरू झाली. यामध्ये ३ सप्टेंबर २०२१ पर्यंत गुंतवणूक करता येणार आहे. सॉवरेन गोल्ड बाँडसाठी (SGB) इश्यू किंमत ४,७३२ रुपये प्रति ग्रॅम निश्चित करण्यात आली आहे.
7 / 9
जर तुम्ही सोन्यात गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी एसबीआयने (SBI)एक चांगली संधी आणली आहे. बँक ३० ऑगस्टपासून डिजिटल गोल्ड (Sovereign Gold Bonds) मध्ये गुंतवणूक करण्याचा पर्याय देत आहे, ही गुंतवणूक ३ सप्टेंबरपर्यंत चालू असणार आहे.
8 / 9
सरकारने आरबीआयशी सल्लामसलत करून 'ऑनलाइन' अर्ज करून डिजिटल पद्धतीने पैसे भरणाऱ्या गुंतवणूकदारांना ५० रुपयांची सवलत देण्याचा निर्णय घेतला आहे. बँकेने सांगितले की, गोल्ड बाँडची किंमत प्रति ग्रॅम ४,७३२ रुपये आहे. आरबीआयच्या म्हणण्यानुसार, अशा गुंतवणूकदारांसाठी गोल्ड बाँडची किंमत प्रति ग्रॅम ४,६८२ रुपये असेल.
9 / 9
सरकारने मे २०२१ ते सप्टेंबर २०२१ या कालावधीत सहा हप्त्यांमध्ये सरकारी गोल्ड बाँड जारी करण्याची घोषणा केली होती. आरबीआय भारत सरकारच्यावतीने बाँड जारी करते. या बाँडची विक्री बँकांद्वारे (छोट्या वित्त बँका आणि पेमेंट बँका वगळून), स्टॉक होल्डिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (एसएचसीआयएल), नियुक्त पोस्ट कार्यालये आणि मान्यताप्राप्त शेअर मार्केट नॅशनल स्टॉक एक्स्चेंज ऑफ इंडिया लिमिटेड आणि बीएसईच्या माध्यामातून केली जाते.
टॅग्स :GoldसोनंSilverचांदी