शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Gold Silver Price Today: मस्तच! सोन्याच्या दरात मोठी घसरण, आठवड्याचा शेवट गोड; जाणून घ्या लेटेस्ट दर...

By ऑनलाइन लोकमत | Published: July 09, 2021 7:04 PM

1 / 8
डॉलरच्या तुलनेत रुपयाला मजबूती मिळाल्यानं आणि आंतरराष्ट्रीय बाजारात किमती घसरल्यानं सोन्याच्या दरात घट झाल्याचं पाहायला मिळालं. त्यामुळे आठवड्याचा शेवटचा दिवस गोड झाला.
2 / 8
दिल्लीच्या सराफा बाजारात आज सोन्याच्या दरात ४५१ रुपयांची घट नोंदवली गेली. त्यानुसार दिल्लीत आज सोन्याचा दर १० ग्रॅमसाठी ४६ हजार ८४४ रुपये इतका होता. काल हाच दर ४७ हजार २९५ रुपये इतका होता.
3 / 8
सोन्यासोबतच चांदीच्या दरातही आज घसरण झाल्याचं पाहायला मिळालं. चांदीच्या दरात ५५९ रुपयांची घट नोंदविण्यात आली. यासह चांदीचा आजचा क्लोजिंग रेट प्रति किलो ६७ हजार ४६५ रुपये इतका नोंदवण्यात आला. गुरुवारी हाच दर ६८ हजार ०२४ रुपये इतका होता.
4 / 8
आंतरराष्ट्रीय बाजारातही सोन्याच्या दरात घट नोंदविण्यात आली. सोन्याचा दर १८०२ डॉलरच्या स्तरावर ट्रेंड करत होता. तर चांदीच्या दरात सध्या ०.५० टक्के वाढीसह २६.११ डॉलर प्रति औंसवर ट्रेंड करत आहे.
5 / 8
एमसीएक्सवरही सोन्याच्या दरात आज घट दिसून आली. संध्याकाळी ५ वाजता ऑगस्टसाठीचा सोन्याचा दर ३१ रुपयांच्या घटसह ४७ हजार ६९० रुपयांवर ट्रेंड करत होता. तर ऑक्टोबरसाठीचा दर ९१ रुपयांच्या घटीसह ४७ हजार ९४५ रुपयांवर ट्रेंड करत होता.
6 / 8
एमसीएक्सवर चांदीच्या दरात मात्र तेजी पाहायला मिळाली. संध्याकाळी ५ वाजता ऑगस्टसाठीच्या दर ४४ रुपयांच्या तेजीसह प्रतिकिलो ६९,००६ रुपयांवर ट्रेंड करत होता. तर डिसेंबरसाठीचा दर ८४ रुपयांची घट नोंदवून प्रतिकिलो ७० हजार ३४१ रुपयांवर होता.
7 / 8
दरम्यान, सोन्याच्या दरात येत्या आठवड्यात वाढ होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. कारण अमेरिकी बॉन्ड यील्डमध्ये घट नोंदविण्यात आल्यानं याचा परिणाम सोन्याच्या किंमतीवर दिसून येऊ शकतो. त्यामुळेच गेल्या दोन आठवड्यांपासून सोन्याच्या दरात वाढही झाल्याचं पाहायला मिळालं आहे.
8 / 8
गेल्या दोन आठवड्यांमधील सोन्याच्या दरात सरासरी १ टक्क्यांची वाढ झाल्याचं पाहायला मिळालं आहे. त्यामुळे येत्या आठवड्यात सोन्याच्या दरात पुन्हा एकदा वाढ होण्याची दाट शक्यता वर्तविण्यात येत आहे.
टॅग्स :GoldसोनंSilverचांदी