शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Gold Silver Price Today : लग्न सराईपूर्वी सोने झाले स्वस्त, आता दागिने घेण्यासाठी कमी पैसे खर्च होणार!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 18, 2023 6:32 PM

1 / 9
नवी दिल्ली : लग्न सराईपूर्वी सोन्याच्या दरात घसरण झाली आहे. बुधवारी दिल्ली सराफा बाजारात सोने स्वस्त झाले आहे. आज सोन्याचा भाव 56500 रुपयांच्या पुढे बंद झाला आहे.
2 / 9
चांदीचे भाव तेजीसह बंद झाले आहेत. चांदी 70,000 च्या खाली बंद झाली आहे. एचडीएफसी सिक्युरिटीजने (HDFC Secuirities) याबाबत माहिती दिली आहे.
3 / 9
राष्ट्रीय राजधानी दिल्लीच्या सराफा बाजारात बुधवारी सोन्याचा भाव 105 रुपयांनी घसरून 56,526 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला. त्याचवेळी, गेल्या व्यापार सत्रात सोने 56,631 रुपये प्रति 10 ग्रॅमवर ​​बंद झाले होते.
4 / 9
चांदीच्या किमतींबद्दल बोलायचे झाले तर आज त्यामध्ये वाढ झाली आहे. चांदीचा भाव 52 रुपयांच्या वाढीसह 69,694 रुपये प्रति किलोवर बंद झाला.
5 / 9
दिल्लीतील सोन्याचा स्पॉट भाव 105 रुपयांनी घसरून 56,526 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला आहे, असे एचडीएफसी सिक्युरिटीजच्या एका विश्लेषकाने म्हटले आहे.
6 / 9
एक्सपर्टनी सांगितले की, मंगळवारी डॉलर निर्देशांक 0.18 टक्क्यांनी मजबूत झाल्यामुळे सोन्याच्या किमतीवर दबाव आला. यूएस बाँड उत्पन्न देखील अलीकडील नीचांकी वरून सुधार झाला आहे.
7 / 9
जर आपण जागतिक बाजाराबद्दल बोललो, तर विदेशी बाजारात सोने नफ्यासह 1,910 डॉलर प्रति औंसवर व्यवहार करत होते. चांदीचा भावही वाढून 24.16 डॉलर प्रति औंसवर होता.
8 / 9
तुम्हालाही घरी बसून सोन्याचे लेटेस्ट दर तपासायचे असतील तर त्यासाठी तुम्हाला 8955664433 या क्रमांकावर मिस कॉल द्यावा लागेल. यानंतर तुमच्या मोबाईलवर मेसेज येईल.
9 / 9
यासह, अधिक माहितीसाठी तुम्ही www.ibja.co किंवा ibjarates.com वर डिटेल्स तपासू शकता.
टॅग्स :Goldसोनंbusinessव्यवसाय