शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Gold Price Today : सोन्याच्या दरात मोठी घसरण, सव्वा वर्षातील नीचांकी पातळीवर; जाणून घ्या, लेटेस्‍ट रेट

By ऑनलाइन लोकमत | Published: July 22, 2022 2:09 PM

1 / 9
जागतिक बाजारातून संमिश्र संकेत मिळत असतानाच, सोन्याच्या दरात सातत्याने घसरण होत असल्याचे चित्र आहे. आठवड्यातील ट्रेडिंगच्या शेवटच्या दिवशीही सोन्याच्या दरात घसरण दिसत आहे आणि आता सोने सव्वा वर्षातील निचांकी पातळीवर ट्रेडिंग करत आहे. अशात, आपणही सोन्या-चांदीची खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ही आपल्यासाठी आनंदाची बातमी आहे.
2 / 9
आज काय आहे सोन्याचा भाव? - मल्टी कमोडिटी एक्सचेन्जवर (MCX) आज सकाळी सोन्याचा भाव 30 रुपयांनी घसरून 50,345 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला आहे. तर एमसीएक्सवर चांदीचा भाव सकाळी 76 रुपयांनी घसरून 55,335 रुपये प्रति किलोवर आला आहे.
3 / 9
यापूर्वी, सोन्याच्या ट्रेडिंगची सुरुवात 50,385 रुपयांवर झाली होती. तर चांदीच्या ट्रेडिंगची सुरुवात 55,435 रुपयांवर झाली होती. आता सोने आपल्या गेल्या बंद भावाच्या तुलनेत 0.06 टक्क्यांनी घसरले आहे. तर, चांदी आपल्या गेल्या बंद दराच्या तुलनेत जवळपास 0.14 टक्यांनी घसरली आहे.
4 / 9
काय म्हणतात एक्सपर्ट्स? - सोन्याच्या दरासंदर्भात बोलताना तज्ज्ञ म्हणतात, ग्‍लोबल मार्केटमध्ये सातत्याने मजबूत होत असलेल्या डॉलरचा परिणाम सोने आणि चांदीच्या किमतीवर होतो. तो या पुढेही दिसेल आणि यामुळेच सोन्याचा दर एक वर्षातील निचांकी पातळीवर पोहोचला आहे.
5 / 9
बाजारातील स्थिती पाहता, सध्या गुंतवणूकदार डॉलरमध्येच पैसे गुंतवत असून सोने विकताना दिसत आहेत. तसेच, सरकारने भारतीय बाजारात सोन्यावरील आयात शुल्‍क बढवल्यामुळे ही घसरण झाल्याचे बोलले जात आहे. यामुळे भविष्यातही सोन्याच्या दरात घसरण दिसू शकते.
6 / 9
कसा ठरतो सोन्याचा दर? - खरे तर सोन्याचा भाव जगातील कोणतेही सरकार ठरवत नाही. भाव ठरवण्याचा कोणताही कायदेशीर नियम नाही. सोन्याचा भाव केवळ आंतरराष्ट्रीय बाजारावर अवलंबून असतो. बरोबर शंभर वर्षांपूर्वी म्हणजे १९१९ साली लंडनच्या पाच मोठ्या बुलियन ट्रेडर्सनी एकत्र येऊन सोन्याचे भाव निश्चित करण्याची पद्धत सुरू केली. लंडनमध्ये त्यावेळी ब्रिटिशांची सत्ता होती.
7 / 9
त्या पाच जणांमध्ये रोथ्सचाइल्ड हे तेव्हाचे सर्वात श्रीमंत कुटुंब होते. पहिला भाव एक ट्रॉय औंसला ४.९३७५ ब्रिटिश पाऊंड होता. आता ट्रॉय औंस म्हणजे किती हा प्रश्न आहेच. त्या काळात मासा, गुंज आणि तोळा या परिमाणातच सोनं मोजलं जायचं. दशमान पद्धत आल्यानंतर सोन्याचा भाव ग्रॅमच्या स्वरूपात ठरवण्यात आला.
8 / 9
लंडनमध्ये ठरवला जातो सोन्याचा दर - आता सोन्याचा भाव लंडनमध्ये ठरवला जातो. जगातले १५ बँकर्स(बँका) एकत्र येऊन सोन्याचा भाव ठरवतात. या १५ बँकांमध्ये मॉर्गन स्टॅनली, एचएसबीसी, नोव्हा स्कॉटिया, स्टँडर्ड चार्टर्ड अशी काही प्रसिद्ध नावे आहेत. इतर दोन बँका चिनी आहेत. बँक ऑफ चायना आणि इंडस्ट्रियल अँड कमर्शिअल बँक ऑफ चायना, अशी त्यांची नावे आहेत.
9 / 9
सोन्याचा भाव ठरवण्यात आयजीबेए म्हणजेच इंडियन बुलियन ज्वेलर्स असोसिएशनचा महत्त्वाचा हिस्सा असतो. या संघटनेचे सभासद भारतातील मोठे व्यापारी असतात. खरेदी आणि विक्री, असे दोन दर असतात त्या दरांची सरासरी काढून सोन्याचा भाव ठरवला जातो. सोने आपल्या बँका परदेशी बँकांकडून खरेदी करतात. त्याच्यावर त्यांचे सर्व्हिस चार्जेस लागतात आणि डिलर्सना विकतात. त्यानंतर डिलर्स ते सोन्याचे व्यापारी आणि दुकानदारांना विकतात. त्यामुळेच आंतरराष्ट्रीय भाव आणि भारतातल्या भावात तफावत आढळून येते.
टॅग्स :GoldसोनंSilverचांदीMarketबाजार