शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Gold, Silver Price Today: आनंदाची बातमी! सोने 800 रुपये, चांदी हजार रुपयांनी स्वस्त, फटाफट चेक करा आजचे दर

By ऑनलाइन लोकमत | Published: May 07, 2023 1:32 PM

1 / 9
: शुक्रवारी उच्चांकी भावावर पोहोचलेल्या चांदीच्या भावात शनिवारी एक हजार रुपयांची घसरण होऊन ती ७६,८०० रुपये प्रतिकिलोवर आली.
2 / 9
सोन्याच्या भावातही ८०० रुपयांची घसरण होऊन ते ६१ हजार ३०० रुपये प्रतितोळ्यावर आले.
3 / 9
शुक्रवारी सोन्याने ६२ हजारांचा टप्पा ओलांडला व ते ६२,१०० रुपये प्रतितोळ्यावर पोहोचले होते. चांदी ७७,८०० रुपये या उच्चांकी भावावर पोहोचली होती. मा
4 / 9
मात्र, आंतरराष्ट्रीय पातळीवर दलालांकडून अचानक या धातूंची विक्री वाढल्याने भाव कमी झाले.
5 / 9
शनिवारी एकाच दिवसात चांदी एक हजार रुपयांनी घसरली. तसेच सोनेही ८०० रुपयांनी कमी झाले.
6 / 9
जानेवारीसोनं ५६,१००चांदी ७३,५०० तर फेब्रुवारीसोनं ५७,२६०चांदी ७४,१००
7 / 9
मार्च सोनं६१,१६० चांदी७०,६०० तर एप्रिल महिन्यात सोन ६१,८०० आणि चांदी८०,१०० मे महिन्यात सोनं६२,४०० आणि चांदी ८२,७००
8 / 9
सराफा बाजारात पुन्हा एकदा सोन्याचे दर घसरले आहेत. पण, आज चांदीची धामधूम काल दिसली. मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर सोन्याचा दर घसरला आहे, तर चांदीचा दर वाढला आहे.
9 / 9
गेल्या काही महिन्यापासून सोनं-चांदीच्या दराने मोठी झेप घेतली होती, पण आता या महिन्यात रेट थोडे कमी झाल्याचं दिसतं आहे.
टॅग्स :GoldसोनंSilverचांदी