gold silver price today latest news update on december 27th february 2023
Gold Price Today: आनंदाची बातमी! सोनं-चांदीचे दर घसरले, चेक करा लेटेस्ट रेट By ऑनलाइन लोकमत | Published: February 27, 2023 7:07 PM1 / 8गेल्या काही महिन्यांपासून सोनं-चांदीचे दर गगनाला भिडेल आहेत. यामुळे ग्राहकांनी सोनं-चांदी खरेदी करण्याकडे पाठ फिरवली आहे. पण, आता सोनं-चांदी खरेदी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. 2 / 8Gold Price Today: आज, 27 फेब्रुवारी 2023 रोजी, जागतिक ट्रेंडमध्ये भारतीय सराफा बाजारात सोने आणि चांदीच्या किमतीत घसरण झाली आहे. दहा ग्रॅम सोने 55,520 रुपयांवर स्वस्त झाले आहे. एक किलो चांदीचा दरही खाली आला असून तो आता 63,227 रुपयांना विकला जात आहे. 3 / 8सोमवारी राष्ट्रीय राजधानीच्या सराफा बाजारात सोन्याचा भाव 185 रुपयांनी घसरून 55,520 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला. मागील ट्रेडिंग सत्रात सोन्याचा भाव 55,705 रुपये प्रति 10 ग्रॅमवर बंद झाला होता. 4 / 8चांदीचा भावही 798 रुपयांनी घसरून 63,227 रुपये प्रति किलोवर बंद झाला. दिल्लीतील स्पॉट सोन्याच्या किमती 185 रुपयांनी घसरून 55,520 रुपये प्रति 10 ग्रॅमवर आल्या आहेत.5 / 8आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचा भाव 1,811 डॉलर प्रति औंस तर चांदीचा भावही घसरून 20.75 डॉलर प्रति औंस झाला.6 / 8Gold Price Today: सोनं-चांदीचे दर तुम्ही घरबसल्या सहज शोधू शकता. यासाठी तुम्हाला 8955664433 या नंबरवर मिस्ड कॉल द्यावा लागेल आणि तुमच्या फोनवर एक मेसेज येईल, ज्यामध्ये तुम्ही नवीनतम दर पाहू शकता.7 / 8विशेष म्हणजे शेअर बाजारातील तेजीचा फायदा घेण्यासाठी गुंतवणूकदारांनी जानेवारीमध्ये गोल्ड ईटीएफमधून 199 कोटी रुपये काढून घेतले. Amfi डेटानुसार, डिसेंबर 2022 मध्ये गोल्ड ETF मधून गुंतवणूकदारांनी 273 कोटी रुपये आणि नोव्हेंबरमध्ये 195 कोटी रुपये काढले.8 / 8 Gold Price Today: त्याआधी, ऑक्टोबरमध्ये गोल्ड ईटीएफमध्ये 147 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात आली होती. आणखी वाचा Subscribe to Notifications