Gold-Silver Price Update Big change in gold-silver price Know the rates on 15th August
Gold-Silver Price Update : सोन्या-चांदीच्या दरात मोठा बदल; जाणून घ्या १५ ऑगस्ट दिवशीचे दर By ऑनलाइन लोकमत | Published: August 15, 2024 11:22 AM1 / 7सोन्या -चांदीच्या दरात नेहमी बदल होतं असतो. केंद्रीय अर्थसंकल्पात सोन्या-चांदीवरील करात कपात केल्यामुळे सोन्याच्या दरात मोठी कपात झाली, देशभरात सोन्याचे दर चार ते पाट हजार रुपयांनी कमी झाले आहेत. 2 / 7१५ ऑगस्ट स्वातंत्र्यदिनी गुरुवारी सोन्याच्या दरात घसरण दिसून आली. चांदीच्या दरात किरकोळ वाढ झाली आहे. दिल्लीत २४ कॅरेट सोन्याच्या १० ग्रॅमचा भाव ७१,६५० रुपयांवर पोहोचला आहे. मुंबई आणि कोलकाता येथे २४ कॅरेट सोन्याचा भाव अनुक्रमे ७१,५०० रुपये आणि ७१,५१० रुपये प्रति १० ग्रॅम झाला आहे. चांदीचा भावही ८३,५०० रुपये प्रतिकिलो झाला आहे.3 / 7आज मुंबईत २२ कॅरेट सोन्याचे दर १० ग्रॅम सोन्याचे भाव ६५,५४० रुपये आहेत, काल याचे दर ६५,५५० रुपये होते. तर आज मुंबईत २४ कॅरेट सोन्याचे दर ७१, ५०० रुपये आहे, काल याचे दर ७१,५१० रुपये होती. 4 / 7हैदराबादमध्ये २२ कॅरेट सोन्याचे भाव ६५,५४० रुपये आहे. काल याचे दर ६५,५५० रुपये होता. तर २४ कॅरेट सोन्याचे भाव ७१,५०० रुपये आहे, काल याचे दर ७१,५०० रुपयेच होते. 5 / 7चेन्नईत २४ कॅरेट सोन्याचे भाव ७१,५१० रुपये आहे, काल याचे ७१,५१० रुपये होते. 6 / 7एमसीएक्सवर चांदीचा भाव ५ सप्टेंबरला ९४९ रुपयांनी घसरला आणि ८१०४९ रुपये प्रति किलोवर बंद झाला, तर ५ डिसेंबरसाठी चांदीचा भाव ८३५४१ रुपये प्रति किलो होता. याशिवाय, ५ मार्च २०२५ चा वायदा चांदीचा भाव ८६०२८ रुपयांवर होता.7 / 7MCX वर १४ ऑगस्टच्या शेवटच्या ट्रेडिंग सत्रात, ४ ऑक्टोबर रोजी डिलिव्हरीसाठी सोन्याचा भाव ७०६९९ रुपये प्रति १० ग्रॅमवर बंद झाला, तर ५ डिसेंबरला डिलिव्हरीसाठी सोन्याचा भाव ७०५७६ रुपये प्रति १० ग्रॅमवर बंद झाला. आणखी वाचा Subscribe to Notifications