शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Gold Silver Rate : सोन्या चांदीच्या दरात मोठी घसरण! जाणून घ्या तुमच्या शहरातील दर

By ऑनलाइन लोकमत | Published: August 28, 2024 1:00 PM

1 / 9
Gold Silver Rate : गणेशोत्सव १० दिवसानंतर सुरू होणार आहे. या पार्श्वभूमीवर आज सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण झाली आहे.
2 / 9
मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर चांदी सुमारे १४०० रुपयांनी स्वस्त झाली आहे. सोनेही प्रति १० ग्रॅम ३०० रुपयांनी स्वस्त झाले आहे.
3 / 9
देशांतर्गत बाजारात चांदीच्या दरात मोठी घसरण झाली आहे. मल्टी कमोडिटी एक्सचेंजमध्ये बुधवारी चांदी १४१३ रुपयांनी स्वस्त होऊन ८४,२५४ रुपये झाली. तर मंगळवारी चांदी ८५,६५८ रुपये प्रति किलोवर बंद झाली.
4 / 9
मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर सोने ३०० रुपये प्रति १० ग्रॅमने स्वस्त झाले आहे. काल सोन्याचा भाव ७२,१२२ रुपये प्रति १० ग्रॅमवर ​​बंद झाला. आज बुधवारी दोन्ही मौल्यवान धातूंच्या किमतीत घट झाली आहे.
5 / 9
देशांतर्गत बाजारासह आंतरराष्ट्रीय बाजारातही सोन्या चांदीच्या दरात घसरण झाली आहे. बुधवारी २८ ऑगस्ट रोजी COMEX वर सोने १७.७१ डॉलरने घसरून २,५०७.९५ डॉलर प्रति औंस झाले. तर कोमॅक्सवर चांदी ०.५५ डॉलरने स्वस्त झाली आहे आणि २९.४७ डॉलरवर आली आहे.
6 / 9
दिल्लीत २४ कॅरेट सोन्याचा दर ७३,४०० रुपये आआहे, तर २२ कॅरेट ६७,३०० रुपये आहे. मुंबईत २४ कॅरेट सोन्याचा दर ७३,२५० रुपये तर २२ कॅरेट ६७,३०० रुपये आहे.
7 / 9
चेन्नईत २४ कॅरेट सोन्याचा दर ७३,२५० रुपये तर २२ कॅरेट सोन्याचा दर ६६,१५० रुपये आहे. कोलकाता येथे २४ कॅरेट सोन्याचा दर ७३,२५० रुपये कॅरेट असून २२ कॅरेट सोन्याचा दर ५५,९४० रुपये आहे.
8 / 9
तर अहमदाबादमध्ये २४ कॅरेट सोन्याचा दर ७३,४०० रुपये असून २२ कॅरेट सोन्याचा दर ६७, ३०० रुपये आहे.
9 / 9
बेंगळुरुमध्ये २४ कॅरेट सोन्याचा दर ७३,२५० रुपये असून २२ कॅरेट सोन्याचा दर ६७, १५० रुपये आहे.
टॅग्स :GoldसोनंSilverचांदी