शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Gold Silver Rate: आनंदाची बातमी! दिवाळीनंतर सोनं-चांदी झालं स्वस्त; पाहा आजचे दर

By ऑनलाइन लोकमत | Published: November 17, 2023 2:18 PM

1 / 10
सोनं-चांदी खरेदी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. दिवाळानंतर चांदीच्या दरात घट झाली आहे. तर दुसरीकडे सोन्याच्या दरातही बदल झाले आहेत.
2 / 10
देशात आता लग्नाचा हंगाम सुरू होईल. या पार्श्वभूमीवर आता सोन्या-चांदीच्या दरात बदल झाला आहे. मल्टी कमोडिटी एक्सचेंजमध्ये सोन्याचा भाव ६०,६८६ रुपये प्रति १० ग्रॅमवर ​​उघडला.
3 / 10
कालच्या तुलनेत आज सकाळी सोन्याचा भाव ३८ रुपयांनी म्हणजेच ०.०६ टक्क्यांनी घसरून ६०,७६० रुपयांवर आला आहे. काल सोन्याचा दर ६०,७२२ रुपये होता.
4 / 10
आज देशांतर्गत बाजारात सोन्याच्या दरात वाढ होत असतानाच चांदीच्या दरात घसरण दिसून येत आहे. सुरुवातीच्या टप्प्यात चांदी ७३,३४३ रुपये प्रति किलोच्या पातळीवर उघडली.
5 / 10
यानंतर, त्याच्या किमतीत आणखी घसरण दिसून आली आणि कालच्या तुलनेत ७० रुपयांनी म्हणजेच ०.१० टक्क्यांनी घट होऊन तो ७३,२९० रुपयांवर पोहोचला. गुरुवारी वायदे बाजारात चांदीचा भाव ७३,३६० रुपयांवर बंद झाला.
6 / 10
आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्या-चांदीच्या दरात वाढ होताना दिसत आहे. एका अहवालानुसार, आज सोने कालच्या तुलनेत ०.१४ टक्क्यांनी महागले आहे.
7 / 10
१,९८३.५० डॉलर प्रति औंस. देशांतर्गत बाजाराप्रमाणेच आंतरराष्ट्रीय बाजारातही चांदीच्या दरात घसरण होत आहे. चांदी कालच्या तुलनेत ०.२१ टक्के स्वस्त आहे आणि प्रति औंस डॉलर २३.८८३ वर आहे.
8 / 10
दिल्ली- २४ कॅरेट सोने ६१,८४० रुपये प्रति १० ग्रॅम, चांदी ७९,५०० रुपये प्रति किलो चेन्नई- २४ कॅरेट सोने ६२,१८० रुपये प्रति १० ग्रॅम, चांदी ७९,५०० रुपये प्रति किलो मुंबई- २४ कॅरेट सोने ६१,६९० रुपये प्रति १० ग्रॅम, चांदी ७६,५०० रुपये प्रति किलो.
9 / 10
कोलकातामध्ये- २४ कॅरेट सोने ६१,६९० रुपये प्रति १० ग्रॅम, चांदी ७६,५०० रुपये प्रति किलो लखनौ- २४ कॅरेट सोने ६१,८४० रुपये प्रति १० ग्रॅम, चांदी ७६,५०० रुपये प्रति किलो.
10 / 10
इंदूर- २४ कॅरेट सोने६१,६९० रुपये प्रति १० ग्रॅम, चांदी ७६,५०० रुपये प्रति किलो जयपूर- २४ कॅरेट सोने ६१,८४० रुपये प्रति १० ग्रॅम, चांदी ७६,५०० रुपये प्रति किलो नोएडा- २४ कॅरेट सोने ६१,८४० रुपये प्रति १० ग्रॅम, चांदी ७६,५०० रुपये प्रति किलो.
टॅग्स :GoldसोनंSilverचांदी