gold silver rate today are down due to global price decline and reduced demand here
Gold Silver Rate: सोन्या-चांदीच्या दरात घसरण! फटाफट चेक करा आजचे दर By ऑनलाइन लोकमत | Published: May 22, 2023 2:15 PM1 / 9तुम्ही जर सोनं-चांदी खरेदी करण्याच्या तयारीत असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. सोन्या आणि चांदीचे दर आज भारतीय बाजारपेठेत घसरले आहेत. 2 / 9सोन्याच्या दरात आज चांगलीच घसरण झाली असून वरच्या पातळीवरून चांदीही स्वस्त होत आहे.3 / 9मल्टी कमोडिटी एक्स्चेंजवर आज सोने १६९ रुपये किंवा ०.२८ टक्क्यांनी स्वस्त झाले असून सोन्याचे दर ६०२१० रुपये प्रति १० ग्रॅम आहे. सोने आज ६०२०३ रुपयांपर्यंत खाली आले असून,दर ६०३३५ रुपये प्रति १० ग्रॅम वर आहे. 4 / 9आज चांदीमध्ये अधिक घसरण दिसून येत असून ती सुमारे ५०० रुपयांनी उपलब्ध होत आहे. आज तुम्ही चांदी खरेदी केली तर मोठी बचत होऊ शकते.5 / 9एमसीएक्सवर चांदी ४५४ रुपये किंवा ०.६२ टक्क्यांच्या घसरणीसह व्यवहार करत आहे. चांदी ७२८६७ रुपये प्रति किलो दराने व्यवहार करत आहे. आज चांदीचा घसरलेला दर बघितला तर तो ७२८१० रुपये प्रति किलोपर्यंत गेला आणि याशिवाय वरच्या बाजूने ७३१०० रुपयांची पातळीवर आहे. 6 / 9जागतिक बाजार पेठेत आज सोने स्वस्त झाले असून, त्याचा परिणाम देशांतर्गत बाजारावरही दिसून येत आहे.7 / 9 कोमॅक्सवर ६.२० डॉलरच्या घसरणीनंतर सोने आज प्रति औंस १,९७५.४० वर व्यवहार करत आहे. 8 / 9याशिवाय कोमॅक्सवर चांदी०.१५८ डॉलर किंवा ०.६६ टक्क्यांच्या घसरणीनंतर २३.९०२ डॉलर प्रति औंसवर व्यवहार करत आहे.9 / 9दोन दिवसापूर्वी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने दोन हजार रुपयांची नोट व्यवहारातून बंद करणार असल्याचे जाहीर केले. या घोषणेनंतर सोन्या-चांदीच्या मागणीत मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचे समोर आले आहे. चीननंतर भारतात सोन्याचा (Gold) खप जगात सर्वाधिक आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications