Gold-Silver Rate Today Big change in gold silver rate bullish again Check today s price
Gold-Silver Rate Today : सोन्या-चांदीच्या दरात मोठा बदल, पुन्हा तेजी; पटापट चेक करा आजचा भाव By ऑनलाइन लोकमत | Published: June 19, 2024 2:22 PM1 / 5Gold Silver Price 19 June: भारतीय सराफा बाजारात आज, १९ जून २०२४ रोजी सकाळी सोन्या-चांदीच्या दरात वाढ झाली आहे. सोन्याचे दर आता ७१ हजार रुपये प्रति १० ग्रॅम, तर चांदीचे दर ८८ हजार रुपये प्रति किलोपेक्षा अधिक झालेत. राष्ट्रीय स्तरावर २४ कॅरेट १० ग्रॅम ९९९ शुद्धतेच्या सोन्याची किंमत ७१,७४० रुपये आहे. तर ९९९ शुद्धतेच्या चांदीची किंमत ८८१०० रुपये आहे.2 / 5इंडिया बुलियन ज्वेलर्स असोसिएशनने दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी संध्याकाळी २४ कॅरेटचे शुद्ध सोन्याचा दर ७१२८५ रुपये प्रति १० ग्रॅम होता, जो आज (बुधवार) सकाळी महाग होऊन ७१७४० रुपयांवर पोहोचला. त्याचप्रमाणे शुद्धतेच्या आधारे सोने-चांदीच्या दरात वाढ झाली.3 / 5अधिकृत वेबसाइट ibjarates.com नुसार , आज ९९५ शुद्धतेच्या सोन्याचा भाव ७१४५३ रुपये प्रति १० ग्रॅम आहे. तर ९१६ (२२ कॅरेट) शुद्धतेच्या सोन्याचा भाव ६५७१४ रुपये प्रति १० ग्रॅम आहे. ७५० (१८ कॅरेट) शुद्ध सोन्याचा भाव ५३,८०५ रुपये प्रति १० ग्रॅम आहे. तर ५८५ (१४ कॅरेट) शुद्धतेच्या सोन्याचा भाव ४१९६८ रुपये प्रति १० ग्रॅम झालाय.4 / 5मिस्ड कॉलद्वारेही तुम्ही सोन्या-चांदीचे दर तपासू शकता. २२ कॅरेट आणि १८ कॅरेट सोन्याची किंमत जाणून घेण्यासाठी तुम्ही ८९५५६६४४३३ वर मिस्ड कॉल देऊ शकता. यानंतर थोड्याच वेळात तुम्हाला एसएमएसद्वारे दराची माहिती मिळेल. तसंच ibjarates.com अधिकृत वेबसाईटवर जाऊन तुम्ही सकाळी आणि संध्याकाळी गोल्ड रेट अपडेट्स जाणून घेऊ शकता.5 / 5इंडियन बुलियन ज्वेलर्स असोसिएशनने जारी केलेल्या किमतींमध्ये वेगवेगळ्या शुद्धतेच्या सोन्याच्या स्टँडर्ड किमतीची माहिती दिली जाते. हे सर्व दरांमध्ये कर आणि मेकिंग चार्जेसचा समावेश नसतो. आयबीजेएने जारी केलेले दर देशभरात समान आहेत. परंतु त्याच्या किंमतींमध्ये जीएसटीचा समावेश नाही. दागिने खरेदी करताना करामुळे सोन्या-चांदीचे दर जास्त असू शकतात. आणखी वाचा Subscribe to Notifications