gold silver rate update today 26 april gold bullion rate silver rate today gold jewellery rate
Gold Silver Rate Update: सोनं-चांदीचे भाव गडगडले? फटाफट चेक करा आजचे दर By ऑनलाइन लोकमत | Published: April 26, 2023 12:32 PM1 / 9Gold Silver Rate Update: गेल्या काही दिवसापासून सोन्या-चांदीचे भाव स्थिर आहेत. काल काहीसे दर उतरले होते, पण आज पुन्हा सोन्या -चांदीच्या दराने उसळी घेतल्याचे पाहायला मिळाले आहे. 2 / 9तुम्ही जर आज सोनं खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्या खिसा आणखी खाली करावा लागणार आहे. 3 / 9आज फ्युचर्स मार्केटमध्ये, मल्टी कमोडिटी एक्स्चेंजवर सोन्याचा भाव घसरणीसह कायम आहे. सोने सध्या ६९ रुपयांनी किंवा ०.११ टक्क्यांनी घसरून ६०१९२ रुपये प्रति १० ग्रॅम दराने व्यवहार करत आहे. 4 / 9आज, वरच्या बाजूला ६०२२३ रुपये प्रति १० ग्रॅम आणि खाली ६०१२२ रुपये असे दर दिसत होते. सोन्याच्या या किमती त्याच्या मे फ्युचर्ससाठी आहेत.5 / 9आज मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर चांदीच्या दरात सुमारे २३० रुपयांची वाढ दिसून येत आहे. फ्युचर्स मार्केटमध्ये ब्राइट मेटल चांदी आज २२९ रुपये वाढीसह व्यवहार करत आहे. 6 / 9आज चांदीचा दर ७४४९२ रुपये किलो दराने होत आहे. याशिवाय त्याच्या खालच्या स्तरावर किंमत ७४२५० रुपये प्रति किलोपर्यंत घसरली होती आणि वर ७४५९० रुपये प्रति किलो दर दिसत होते. या सोन्याच्या किमती जून फ्युचर्ससाठी आहेत.7 / 9वायदा बाजारमध्ये सोन्याचे दर रिटेल बाजारमध्ये वाढून सोनं महागलं आहे. 8 / 9दिल्लीत २४ कॅरेट शुद्ध सोन्याचा दर ११० रुपयांच्या वाढीसह ६१,५३० रुपये प्रति १० ग्रॅम आहे. मुंबईत २४ कॅरेट शुद्ध सोन्याचा दर ११० रुपयांच्या वाढीसह ६१,०४० रुपये प्रति १० ग्रॅम आहे.9 / 9Gold Silver Rate Update: चेन्नईमध्ये २४ कॅरेट शुद्ध सोन्याचा भाव ११० रुपयांनी वाढून ६१,५३० रुपये प्रति १० ग्रॅम आहे. कोलकात्यात २४ कॅरेट शुद्ध सोन्याचा भाव ११० रुपयांनी वाढून ६१,०४० रुपये प्रति १० ग्रॅमवर आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications