gold silver rate Will gold prices go down or up this week Read in detail
या आठवड्यात सोन्याचे भाव कमी होतील की वाढतील? वाचा सविस्तर By ऑनलाइन लोकमत | Published: May 12, 2024 2:04 PM1 / 6गेल्या काही दिवसापासून सोन्या-चांदीच्या दरात वाढ सुरू आहे. दरात अक्षय्य तृतीयेच्या आधी वाढ झाली. अक्षय्य तृतीयेच्या दिवशीही सोन्या-चांदीच्या दरात वाढ झाली.सोने-चांदी महाग झाली होती.2 / 6या काळात सोन्याचा भाव ७१ हजार रुपयांच्या वर गेला होता. मात्र, याआधी सोन्यामध्ये मोठी घसरण झाली होती. चांदीच्या दरातही घट झाली आहे.3 / 6गेल्या शुक्रवारी MCX एक्सचेंजवर, ५ जून २०२४ रोजी डिलिव्हरीसाठीचे सोने सकाळी ५२६ रुपयांच्या वाढीसह ७२,१६५ रुपये प्रति १० ग्रॅमवर व्यवहार करत होते. सकाळपासूनच सोन्यात वाढ झाली होती. 4 / 6५ ऑगस्ट २०२४ रोजी डिलिव्हरीसाठी सोन्याचा भाव ५७३ रुपयांच्या वाढीसह ७२,३२० रुपये प्रति १० ग्रॅमवर होता. तर ४ ऑक्टोबर २०२४ रोजी डिलिव्हरीसाठी सोन्याचा भाव ७८९ रुपयांच्या वाढीसह ७२,५८७ रुपयांवर होता.5 / 6शुक्रवारी सकाळी, ५ जुलै २०२४ रोजी डिलिव्हरीसाठी चांदीचा भाव ५८५ रुपयांनी वाढून MCX एक्सचेंजवर ८५,०८५ रुपये प्रति किलो होता. तर ५ सप्टेंबर २०२४ रोजी डिलिव्हरीसाठी चांदीचा भाव ६०२ रुपयांच्या वाढीसह ८६,५४५ रुपयांवर होता. 6 / 6चांदीही वाढीसह बंद झाली. दरम्यान, चांदीच्या जागतिक किमतीत वाढ झाली आहे. कॉमेक्सवर चांदीची फ्युचर्स किंमत ०.८१ टक्क्यांनी किंवा ०.२३ डॉलरने २८.६० डॉलर प्रति औंस वर आहे. त्याच वेळी, चांदीची जागतिक स्पॉट किंमत २८.३७ डॉलर प्रति औंस आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications