शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Gold-Silver Rates Today : चांदीच्या किंमतीत तेजी, सोनंही महागलं; पाहा काय आहेत २० जूनचे नवे दर?

By ऑनलाइन लोकमत | Published: June 20, 2024 1:05 PM

1 / 6
बुधवारी सोन्या-चांदीच्या दरात तेजी दिसून आली. यापूर्वी बुधवारी सोन्या-चांदीच्या दरात थोडी घसरण दिसून आली होती. २० जून रोजी सोन्याचा भाव ७२,००० रुपये प्रति १० ग्रॅम होता, तर चांदीचा भाव १,२०० रुपयांनी वाढला. चला तर मग जाणून घेऊया आज सोन्या-चांदीचे नवे दर काय आहेत.
2 / 6
मल्टी कमोडिटी एक्स्चेंजवर (एमसीएक्स) ५ ऑगस्टच्या फ्युचर्स डिलिव्हरीसाठी सोन्याचा भाव ७१,८८० रुपये प्रति १० ग्रॅम झालाय. तर ५ ऑक्टोबरच्या सोन्याचा वायदा डिलिव्हरी ७२,१४३ रुपये आहे.
3 / 6
याआधी बुधवारी ५ ऑगस्ट फ्युचर्स डिलिव्हरीसाठी सोन्याचा भाव ७१७३२ रुपये प्रति १० ग्रॅम होता, तर ५ ऑक्टोबरला सोन्याचा वायदा डिलिव्हरी ७२०२७ रुपये प्रति १० ग्रॅमवर बंद झाला होता. अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हने व्याजदरात कोणताही बदल न केल्यानं गेल्या आठवड्यात सोनं आणि चांदीच्या दरात घसरण झाली होती. मात्र, आज सोन्याच्या दरात वाढ झाली आहे.
4 / 6
चांदीबद्दल बोलायचं झालं तर मल्टी कमोडिटी एक्सचेंज एमसीएक्सवर चांदीच्या दरात आज सुमारे ११०० रुपयांची वाढ नोंदविण्यात आली आहे. एमसीएक्सवर ५ जुलैच्या फ्युचर्स डिलिव्हरीसाठी चांदी ९०५८५ रुपये प्रति किलो, तर चांदी ५ सप्टेंबरच्या फ्युचर्स डिलिव्हरीसाठी ९२७८६ रुपये प्रति किलो झाली आहे. याशिवाय ५ डिसेंबरची फ्युचर्स डिलिव्हरीची चांदी ९५१८५ रुपये प्रति किलो दरानं व्यवहार करत आहे.
5 / 6
यापूर्वी बुधवारी ५ जुलैच्या फ्युचर्स डिलिव्हरीसाठी चांदी ८९४७५ रुपये प्रति किलो, तर ५ सप्टेंबर रोजी फ्युचर डिलिव्हरीसाठीची चांदी ९१५३९ रुपये प्रति किलोवर बंद झाली. याशिवाय ५ डिसेंबर रोजी चांदी वायदा डिलिव्हरी ९३९२९ रुपये प्रति किलोवर बंद झाली.
6 / 6
गुरुवारी अमेरिकन कमॉडिटी बाजारात स्पॉट गोल्ड ०.२ टक्क्यांनी वाढून २,३३१.३८ डॉलर प्रति औंस झालं, तर यूएस गोल्ड फ्युचर्स ०.१ टक्क्यांनी घसरून २,३४५.०० डॉलरवर आले. त्याचवेळी स्पॉट सिल्व्हर ०.५ टक्क्यांनी वधारून २९.९१ डॉलर प्रति औंस, प्लॅटिनम ०.२ टक्क्यांनी घसरून ९७८.४२ डॉलर आणि पॅलेडियम ०.२ टक्क्यांनी घसरून ९०३.२५ डॉलरवर आलं. अमेरिकेच्या फेड रिझर्व्हनं आगामी काळात महागाई कमी होण्याची पुष्टी केल्यानं श्रम बाजार आणि किमतींचा दबाव कमी झाल्याचं ताज्या आकडेवारीवरून दिसून आलंय.
टॅग्स :GoldसोनंSilverचांदी