शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Gold Silver Rates Today : सोन्याची किंमत नव्या शिखरावर, चांदीही लाखाच्या पार; खरेदीपूर्वी पाहा १८ ते२४ कॅरेट सोन्याचे दर

By ऑनलाइन लोकमत | Published: October 22, 2024 1:53 PM

1 / 7
Gold Silver Rates Today : सोन्या-चांदीचे दर अजूनही गगनाला भिडले आहेत. दिवाळीपूर्वी सोन्यानं नवा उच्चांक गाठला. सराफा बाजारात आज २४ कॅरेट सोन्याचा भाव १८ रुपयांनी वाढून ७८,७३२ रुपये प्रति १० ग्रॅम झाला. सराफा बाजारात चांदीच्या दरात प्रतिकिलो ३८१ रुपयांनी वाढ झाली आहे. यानंतर चांदीचा दर ९७,६३५ रुपये प्रति किलोवर पोहोचला.
2 / 7
सोनं आणि चांदीचे हे दर आयबीजेएनं जाहीर केले आहेत. यावर जीएसटी आणि ज्वेलरी मेकिंग चार्जेसचा समावेश नाही. आपल्या शहरातील सोन्या-चांदीच्या दरात १००० ते २००० चा फरक असण्याची शक्यता आहे.
3 / 7
आज २३ कॅरेट सोन्याचा भाव १८ रुपयांनी वाढून ७७,९१९ रुपये प्रति १० ग्रॅम झाला आहे. तर २२ कॅरेट सोन्याचा भाव १७ रुपयांनी वाढून ७१,६६१ रुपये प्रति १० ग्रॅम झालाय.
4 / 7
दुसरीकडे, १८ कॅरेट सोन्याचा भाव आज १७ रुपये प्रति १० ग्रॅम ने वधारला आणि तो ५८,६७६ रुपये प्रति १० ग्रॅम दरानं उघडला. तर १४ कॅरेट सोन्याचा भाव ११ रुपयांनी वाढून ४५,७६६ रुपये प्रति १० ग्रॅम झाला आहे.
5 / 7
इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन (आयबीजेए) ही १०४ वर्षे जुनी संघटना आहे. आयबीजेए दिवसातून दोनदा दुपारी आणि संध्याकाळी सोन्याचे दर जाहीर करते. अर्थ मंत्रालय आणि रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं जारी केलेल्या विविध अधिसूचनेनुसार हे दर सॉवरेन आणि बॉन्ड जारी करण्यासाठी बेंचमार्क दर आहेत.
6 / 7
जीएसटीमुळे २४ कॅरेट सोन्याचा भाव आता ८०,५७८ रुपये प्रति १० ग्रॅम वर पोहोचला आहे. यामध्ये २३४६ रुपयांचा जीएसटी आहे. तर जीएसटीसह २३ कॅरेट सोन्याची किंमत ८०,२५६ रुपये झालीये. ३ टक्के जीएसटीनुसार त्यात २३३७ रुपयांची भर पडली आहे.
7 / 7
२२ कॅरेट सोन्याबद्दल बोलायचं झालं तर आज ते जीएसटीसह ७३,८१० रुपयांवर पोहोचले आहे. यात २१४९ रुपये जीएसटी म्हणून जोडण्यात आलेत. तर एक किलो चांदीचा भाव जीएसटीसह १००५६४ रुपयांवर पोहोचलाय.
टॅग्स :GoldसोनंSilverचांदी