शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Gold Stock End's: चिंताजनक! येत्या 20 वर्षांत पृथ्वीवरील सर्व सोने संपणार; दोन जहाजे भरतील एवढेच शिल्लक

By ऑनलाइन लोकमत | Published: December 09, 2022 4:37 PM

1 / 9
एटीएमधून पैसे येतात हे इतकी वर्षे आपल्याला माहिती होते, आता त्यातून सोने देखील येणार आहे. हैदराबादमध्ये म्हणे जगातील पहिले रिअल टाईम गोल्ड एटीएम सुरु झाले आहे. यातून खास आकाराचे क़ॉईन निघणार आहेत. हे मशीन गोल्डची किंमतही लाईव्ह दाखविते. आता एवढे सगळे असले तरी एक धक्कादायक अहवाल येत आहे. जगातील सारे सोने संपणार आहे.
2 / 9
एकीकडे सोन्याचा खप वाढविण्यासाठी नवनवीन गोष्टींच्या कल्पना लढविल्या जात आहेत. दागिने तर झालेच परंतू, डिजिटल गोल्ड बाँड देखील आले आहेत. सोन्याच्या किंमतींनी पन्नाशी गाठली आहे. तरी देखील सोन्याचा खप एवढा आहे की येत्या २० वर्षांत पृथ्वीवरील सोने संपणार आहे. सोन्याच्या सर्व खाणी बंद पडणार आहेत. यामुळे भविष्यात सोन्यासाठी युद्ध होण्याची देखील शक्यता आहे.
3 / 9
यूएस जिऑलॉजिकल सर्व्हेनुसार, आतापर्यंत सुमारे 2 लाख टन सोने काढले गेले आहे. आता फक्त 50 हजार टनच सोने शिल्लक आहे. जगात किती सोने दडलेले आहे याबाबत वेगवेगळ्या संस्था वेगवेगळी आकडेवारी देतात. ठोस असे कोणीच सांगू शकत नाही. परंतू १९५० नंतर एवढी खोदाई झालीय की जगातील सोने आता संपण्याच्या मार्गावर असल्याचे या संस्था सांगत आहेत.
4 / 9
ज्या वेगाने खोदाई झालीय त्याच वेगाने सोन्याचे साठे देखील संपत चालले आहेत. अनेक खाणी ओस पडू लागल्या आहेत. अमेरिकेच्या गोल्डमॅन सैशनुसार पुढील दोन दशकांत जमीनीखालील सोने पूर्णपणे संपणार आहे. आता पृथ्वीच्या पोटात दोन कार्गो जहाजातून नेता येऊ शकेल एवढेच सोने शिल्लक असल्याचे म्हटले जात आहे.
5 / 9
सोन्याचे साठे संपल्यानंतर काय होईल? यावर सामान्यच नाही तर भलेभले तज्ज्ञदेखील चिंतेत पडत आहेत. सोने संपले तर जगाची अर्थव्यवस्थाच उध्वस्त होण्याची शक्यता आहे. कारण आजही देशांची ताकद ही त्यांच्याकडील सोन्याच्या सुरक्षित साठ्यावरून जोखली जाते. व्यापारातदेखील सोन्याचा मोठा वाटा आहे, हे राजे रजवाड्यांपासून चालत आलेले आहे.
6 / 9
सोन्याचा साठा संपत आला तर जगातील सोन्याच्या किंमती मोठ्याप्रमाणावर वाढण्याची शक्यता आहे. यामुळे कंपन्या नवीन सोन्याच्या शोधात आपली प्रचंड शक्ती खर्ची घालतील. अमेरीक इन्व्हेस्टर बँकर जिम रिचर्ड्स यांच्या पुस्तकानुसार मोठमोठ्या कंपन्याच या क्षेत्रात राहतील. उत्खनन सुरुच राहिल. नवनवीन तंत्रज्ञान येईल. सोन्याच्या किंमती सामान्यांच्या आवाक्याबाहेर जातील. यामुळे सामान्यांकडे असलेले सोनेच काय ते राहणार आहे.
7 / 9
सोन्याच्या शोधात पैसे असलेल्या कंपन्या सर्व अशक्य वाटणारी ठिकाणे शोधू लागतील. समुद्राखाली सोन्याचा शोध लावला जाईल, बर्फाळ वाळवंट, जिथे ध्रुवीय अस्वल राहतात अशा ठिकाणी खाणी लावल्या जातील. पृथ्वीवरून जरी सोने संपले तरी ब्रह्मांडात सोनेच शिल्लक असेल, या आधारे शास्त्रज्ञ त्याचा शोध घेऊ लागतील.
8 / 9
भौतिकशास्त्रज्ञ डॉ. नील डीग्रास टायसन यांच्यानुसार लघुग्रहांमध्ये सोन्याचा साठा असू शकतो. बुध आणि मंगळ यांच्यामध्ये एक असा लघुग्रह आहे, ज्याच्या सोन्याने जगातील प्रत्येक व्यक्ती श्रीमंत होईल असे म्हटले जाते. त्याचे नाव सायक-16 आहे. हा ग्रह सोने, प्लॅटिनम, निकेल आणि लोहापासून बनलेला आहे. सुमारे २२५ किमी एवढा मोठा त्याचा व्यास आहे.
9 / 9
एवढं सोनं पृथ्वीवर आलं तरी काही उपयोग होणार नाही. कारण मग त्याची व्हॅल्यूच राहणार नाही. कोणत्याही वस्तूची किंमत किंवा त्याचे महत्व ती जेव्हा कमी असते तेव्हाच असते. बाजारात सोन्याचा पूर येताच ते मौल्यवान नसेल. जोपर्यंत कमी आहे, तोपर्यंत फक्त सोने आहे.
टॅग्स :Goldसोनं