Golden opportunity to earn millions One month hard work will pay off for the rest of the year
लाखोंच्या कमाईची सुवर्णसंधी! एका महिन्याची मेहनत अन् वर्षभराची कमाई देईल 'हा' व्यवसाय By ऑनलाइन लोकमत | Published: June 04, 2022 3:45 PM1 / 9How to Start Mango Pickle Business: आपल्या देशात जवळपास सर्वच घरांमध्ये ताटात लोणचं असतंच. एकतर घरात बनवलेलं लोणचं खाणं काहीजण पसंत करतात तर अनेक जण विविध लोणची आवर्जुन विकत घेत असतात. लोणचं एक अशी गोष्ट आहे की जी भारतात वर्षभर वापरली जाते. 2 / 9त्यामुळे लोणच्याच्या व्यवसायात अधिक शक्यता निर्माण झाल्या आहेत. लोणचं बनवण्याचा व्यवसाय तुम्ही घरबसल्या सुरू करू शकता. आज जर तुम्ही लोणचं बनवायला सुरुवात केली तर तुम्ही आंब्याचं लोणचं बनवण्यापासून सुरुवात करू शकता. हा आंब्याचा हंगाम आहे. त्यामुळे तुम्हाला कैऱ्या सहज मिळतील आणि आंब्याचं लोणचं सर्वांनाच आवडतं.3 / 9लोणच्याच्या व्यवसायासाठी थोडी मोकळी जागा हवी. फ्लॅटमध्ये राहणाऱ्या लोकांची बाल्कनीही व्यवसाय सुरू करण्यासाठी पुरेशी आहे. त्यामुळे लोणचं बनवणं, कोरडे करणं आणि पॅक करणं सोपं जातं. 4 / 9तुमचं लोणचं दीर्घकाळ टिकण्यासाठी स्वच्छतेची खूप गरज असते. ते बनवताना विशेष काळजी घ्यावी लागते. लोणची प्रत्येक ऋतूत बनवता येतात. पण आंब्याचं लोणचं बनवण्याचा हा सर्वोत्तम काळ आहे. 5 / 9या व्यवसायात लोणच्याची रेसिपी ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. फक्त एक उत्तम रेसिपीच तुमचा लोणच्याचा व्यवसाय यशस्वी बनवू शकते. जेव्हा ग्राहकांना त्याची चव आवडेल तेव्हाच तुमची प्रोडक्ट्स खरेदी करतील. यासाठी तुम्हाला तुमच्या रेसिपीची विशेष काळजी घ्यावी लागेल, जेणेकरून ग्राहकांना तुमच्या लोणच्यांमध्ये एक वेगळीच चव मिळेल आणि मागणी वाढेल. 6 / 9तुम्ही अनेक प्रकारची लोणची बनवू शकता आणि विकू शकता. बहुतांश आंबा आणि लिंबाचं लोणचं बाजारात जास्त विकलं जातं. याशिवाय फणस, लसूण, आवळा, आले आणि मिरचीचंही लोणचं बनवू शकता. लोकांना ऋतूनुसार वेगवेगळी लोणची आवडतात. अशा प्रकारे, आपण हंगामानुसार लोणची बनवून चांगली कमाई करू शकता. 7 / 9लोणचं विकण्यासाठी, आपण पॅकेजिंग आणि किंमतींवर विशेष लक्ष दिलं पाहिजे. बाजारातील उत्पादनाच्या पॅकेजिंगवर बरेच काही अवलंबून असतं. ठरलेल्या किमतीनुसार लोणच्याचे प्रमाण बॉक्समध्ये भरावं. तसंच, तुमच्या ब्रँडचा लोगो आणि उत्पादन तपशील व्यवस्थित लिहा. किंमत निश्चित करताना, तुमचा खर्च व नफा देखील होईल आणि ग्राहकांना देखील जास्त किंमत वाटणार नाही हे लक्षात ठेवा. सुरुवातीला या गोष्टींची विशेष काळजी घेणं आवश्यक आहे.8 / 9तुम्ही १० हजार रुपये खर्च करून लोणच्याचा व्यवसाय सुरू करू शकता. यानंतर तुम्ही तुमच्या उत्पादनाच्या मागणीनुसार नफा मिळवू शकता. जर मागणी चांगली असेल तर एवढ्या खर्चात तुम्हाला १० ते २५ हजार रुपये सहज मिळू शकतात. जर तुमच्याकडे लोणचं जास्त काळ साठवून ठेवण्याची व्यवस्था उपलब्ध असेल, तर आंब्याच्या हंगामात तुम्ही आचार मोठ्या प्रमाणात बनवू शकता. मग वर्षभर विकून तुम्ही लाखोंचा नफा कमवू शकता.9 / 9लोणच्याचा व्यवसाय करण्यासाठी तुमच्याकडे परवाना असणं गरजेचं आहे. यासाठी भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाकडून (FSSAI) परवाना मिळवावा लागेल. यासाठी तुम्हाला ऑनलाइन अर्ज दाखल करता येईल. जर तुमच्याकडे परवाना नसेल तर तुम्हाला दंड देखील होऊ शकतो. आणखी वाचा Subscribe to Notifications