शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

खुशखबर! ‘डीए’पाठोपाठ बोनसही, सणासुदीत सरकारी कर्मचाऱ्यांचे पाकीट होणार भारी

By ऑनलाइन लोकमत | Published: October 07, 2023 6:41 AM

1 / 9
सरकारी कर्मचाऱ्यांच्या यंदाच्या दुसऱ्या सहामाहीतील महागाई भत्त्याची (डीए) घोषणा दसऱ्याच्या सुमारास होण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर कर्मचाऱ्यांना यंदा ७ व्या वेतन आयोगाच्या शिफारशीनुसार बोनस मिळण्याची शक्यता आहे.
2 / 9
त्यामुळे यंदा दिवाळी-दसऱ्यात सरकारी कर्मचारी मालामाल होतील, असा अंदाज आहे. दुसऱ्या सहामाहीतील डीएची घोषणा साधारणत: दसऱ्याच्या आसपास करण्याचा प्रघात आहे. १ जुलै २०२३ पासून हा वाढीव महागाई भत्ता लागू होईल. कर्मचाऱ्यांना जुलैपासूनचा फरकही (एरिअर्स) मिळेल.
3 / 9
रेल्वे कर्मचाऱ्यांना प्रॉडक्टिव्हिटी लिंक्ड बोनसच्या स्वरूपात ७८ दिवसांच्या वेतनाएवढा बोनस मिळतो. यात वाढीची मागणी इंडियन रेल्वे एम्प्लॉईज फेडरेशनने केली. त्यावर सरकारने अजून निर्णय घेतलेला नाही. सध्या पीएलबी बोनस ६ व्या वेतन आयोगाच्या शिफारशीनुसार मिळतो.
4 / 9
फेडरेशनची मागणी काय?- रेल्वे एम्प्लॉइज फेडरेशनने रेल्वेला पत्र पाठवून ७ व्या वेतन आयोगाच्या आधारावर सुधारित बोनस देण्याची मागणी केली आहे.
5 / 9
फेडरेशनने पत्रात म्हटले आहे की, १ जानेवारी २०१६ रोजी ७ व्या वेतन आयोगाच्या शिफारशी लागू केल्या. मात्र, रेल्वे कर्मचाऱ्यांना बोनस (पीएलबी) अजूनही ६ व्या वेतन आयोगाच्या शिफारशींनुसारच मिळत आहे. सध्याच्या काळात हा बोनस खूपच कमी आहे. त्यामुळे त्यात सुधारणा करून ७ व्या वेतन आयोगाच्या शिफारशीनुसार बोनस देण्यात यावा.
6 / 9
फेडरेशनची ही मागणी मान्य झाल्यास कर्मचाऱ्यांना घसघशीत लाभ मिळेल. डीए आणि बोनस अशा दुहेरी लाभ त्यांच्या पदरात पडेल.
7 / 9
किती बोनस?- ६ व्या वेतन आयोगानुसार १७,९५१ रुपये बोनस मिळतो. ७ व्या वेतन आयोगानुसार तो ४६,१५९ हजार रुपये मिळेल. बोनसने सरकारी तिजोरीवर १,८३२ कोटी रुपयांचा बोजा पडतो.
8 / 9
६ व्या वेतन आयोगानुसार रेल्वेच्या ग्रुप डी कर्मचाऱ्यांचे किमान वेतन ७ हजार रुपये होते. ७ व्या वेतन आयोगाने ते वाढवून १८ हजार रुपये केले आहे.
9 / 9
सरकारी कर्मचाऱ्यांनी गेल्या काही दिवसापापसून महागाई भत्ता वाढवण्याची मागणी केली आहे. दरम्यान, आता यात वाढ होण्याची शक्यता आहे.
टॅग्स :Employeeकर्मचारी