Good news After the MTNL-BSNL merger, the cheapest plan came
आनंदाची बातमी! MTNL-BSNL च्या विलीनीकरणानंतर, सर्वात स्वस्त प्लॅन आला By ऑनलाइन लोकमत | Published: August 17, 2024 4:55 PM1 / 8MTNL-BSNL : गेल्या काही दिवसापासून टेलिकॉम कंपन्यांनी रिचार्जच्या दरामध्ये वाढ केली आहे. जिओनेही आपल्या प्लॅनमध्ये बदल केले आहेत. यात काही प्लॅन परवडणारेही आहेत, या जिओच्या परवडणाऱ्या प्लॅनवर बऱ्याच दिवसांपासून चर्चा होत आहे. दरम्यान, आता यातच बीएसएनएलने परवडणारे प्लॅन लाँच केले आहेत.2 / 8या प्लॅनमध्ये यूजर्संना अनेक मोठे फायदे मिळणार आहेत. सर्व दूरसंचार कंपन्यांनी रिचार्जच्या किमती वाढवल्या आहेत, पण बीएसएनएल अजूनही जुन्या किमती लागू करत आहे. त्याचा परिणाम सर्व टेलिकॉम कंपन्यांच्या यूजर बेसवर दिसून येत आहे. बीएसएनएलच्या यूजर बेसमध्ये मोठी वाढ झाली आहे. BSNL चे अनेक प्लान आहेत जे १०० रुपयांपेक्षा कमी किमतीत उत्तम ऑफर देत आहेत.3 / 8बीएसएनएल वापरकर्ते स्वस्तात प्लॅन शोधत असतील तर हा एक चांगला पर्याय ठरू शकतो. बीएसएनएलच्या प्लानमध्ये तुम्हाला २८ दिवसांची वैधता मिळत आहे आणि यामध्ये तुम्हाला ब्राउझिंग डेटासोबत व्हिडीओ स्ट्रीमिंगही मिळत आहे. 4 / 8या सर्व ऑफर तुम्हाला बीएसएनएल २२९ रुपयांमध्ये दिल्या जात आहेत. या प्लॅनमध्ये यूजर्सना अनलिमिटेड लोकल आणि एसटीडी कॉलिंग पूर्णपणे मोफत दिले जात आहे.5 / 8बीएसएनएलच्या प्लॅनमध्ये इंटरनेट डेटाही दिला जात आहे. ग्राहकांना एकूण 60GB डेटा दिला जात आहे. ही संपूर्ण ऑफर वापरकर्त्यांना या संपूर्ण कालावधीसाठी दिली जाईल. 6 / 8या प्लॅनमध्ये दररोज 2GB हाय-स्पीड इंटरनेट दिले जात आहे. हे कार्य तुमच्यासाठी खूप चांगले सिद्ध होणार आहे. हे Jio, Airtel आणि VI च्या प्लॅनसारखे आहे. कारण या प्लॅनमध्ये दररोज १०० एसएमएस दिले जातात.7 / 8BSNL ने MTNL सोबतही करार केला आहे. ही कंपनी दिल्ली आणि मुंबईसारख्या ठिकाणीही आपली सेवा देणार आहे. विशेष म्हणजे दोन्ही कंपन्या यामध्ये आपापले योगदान देणार आहेत. 8 / 8यासाठी सरकारकडून १० वर्षांचा करारही करण्यात आला आहे. यामुळे वापरकर्त्यांना कमी किमतीत जलद इंटरनेट सुविधा मिळणार आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications