शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Airtel च्या ग्राहकांसाठी खुशखबर; रिचार्ज केल्यावर 'असा' मिळणार मोफत हायस्पीड डेटा

By ऑनलाइन लोकमत | Published: May 30, 2021 11:19 PM

1 / 12
सध्या दूरसंचार कंपन्यांमध्ये सुरू असलेल्या स्पर्धेचा फायदा ग्राहकांना मिळताना दिसत आहे. एअरटेल (Airtel), रिलायन्स जिओ (Reliance Jio), व्होडाफोन-आयडिया (Vodafone-Idea) या कंपन्या ग्राहकांसाठी अनेक ऑफर्स घेऊन येताना दिसतात.
2 / 12
एअरटेलनंदेखील आपल्या ग्राहकांसाठी एक ऑफर आणली आहे. ज्यामध्ये ग्राहकांना मोफत डेटाही मिळणार आहे. परंतु एअटेलचं रिचार्ज केल्यानंतर काही ठराविक ग्राहकांनाच या सुविधेचा लाभ घेता येईल.
3 / 12
एअरटेलच्या ग्राहकांना रिचार्ज केल्यानंतर मिळणारा फ्री डेटा हा कूपनच्या माध्यमातून मिळणार आहे. हा डेटा एअरटेल युझर्सच्या अकाऊंटमध्ये क्रेडिट होईल.
4 / 12
एअरटेलचा मोफत डेटा मिळवण्यासाठी कमीतकमी २१९ रूपयांच्या अनलिमिटेड कॉम्बो प्लॅनचं रिचार्ज करावं लागेल. याशिवाय ग्राहकांना ३९९ रूपये आणि ५९८ रूपयांच्या रिचार्जवरदेखील ६ जीबीपर्यंत मोफत डेटा मिळेल.
5 / 12
कंपनीच्या २१९ रूपयांच्या रिचार्ज प्लॅनची वैधता २८ दिवसांची आहे. या प्लॅन अंतर्गत रिचार्ज केल्यावर ग्राहकांना अतिरिक्त २ जीबीपर्यंतचा डेटा दिला जातो.
6 / 12
तर दुसरीकडे ३९९ रूपयांच्या प्लॅनबद्दल सांगायचं झालं तर कंपनी हे रिचार्ज केल्यानंतर ग्राहकांना ४ जीबीपर्यंत डेटा मोफत देते. या प्लॅनची वैधता ५६ दिवसांती आहे.
7 / 12
तर ५९८ रुपयांच्या प्लॅनमध्ये कंपनी ग्राहकांना ६ जीबीपर्यंतचा अतिरिक्त डेटा मोफत देते. या प्लॅनची वैधता ८४ दिवसांची आहे.
8 / 12
एअरटेलचे हे तिन्ही प्लॅन अनलिमिटेड कॉलिंग आणि डेली डेटासह येतात. तिन्ही प्लॅनमध्ये ग्राहकांना १०० एसएमएसची सुविधाही मिळते.
9 / 12
तसंच २१९ रूपयांच्या प्लॅनमध्ये ग्राहकांना दररोज १ जीबी डेटा आणि ३९९ रूपयांच्या आणि ५९८ रूपयांच्या प्लॅनमध्ये ग्राहकांना दररोज १.५ जीबी डेटा देण्यात येतो.
10 / 12
जर तुम्हाला या मोफत डेटाचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला सर्वप्रथम Airtel Thanks App नं रिचार्ज करावं लागेल. हे एअरटेलचं ऑफिशिअल रिचार्ज अॅप आहे.
11 / 12
जर तुमच्याकडे हे अॅप नसेल तर तुम्ही गुगल प्ले स्टोअर किंवा अॅप स्टोअरमधून ते डाऊनलोड करू शकता. यानंतर कंपनी एका एसएमएसद्वारे ग्राहकाला मोफत डेटाबाबात माहिती पाठवते.
12 / 12
Airtel Thanks App मधील My Coupons टॅबमध्ये जाऊन तुम्ही हे मोफत डेटाचं कूपन रिडीम करू शकता. याच ठिकाणी कूपनची एक्सपायरी डेटही तपासू शकता.
टॅग्स :AirtelएअरटेलReliance Jioरिलायन्स जिओVodafoneव्होडाफोनIdeaआयडियाSmartphoneस्मार्टफोन