शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

खूशखबर! दिवाळी बोनससह मिळणार 18 महिन्यांचा थकित DA, मोदी सरकार लवकरच करणार मोठी घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Published: October 05, 2021 2:41 PM

1 / 8
नवी दिल्ली : केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी दिवाळीपूर्वी एक मोठी आनंदाची बातमी येणार आहे. दरम्यान, केंद्र सरकारने दीड वर्षांपासून महागाई भत्ता (डीए) (Dearness allowance – DA) थकबाकी दिली नाही. मात्र, आता केंद्रीय कर्मचाऱ्यांना ही थकबाकी मिळण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
2 / 8
आता 18 महिन्यांपासून प्रलंबित थकबाकीची बाब पंतप्रधान नरेंद्र मोदींपर्यंत पोहोचली आहे. मीडिया रिपोर्टनुसार, पंतप्रधान नरेंद्र यावर लवकरात लवकर निर्णय घेण्याची शक्यता आहे. त्यामुळे केंद्रीय कर्मचाऱ्यांना दिवाळीपर्यंत 18 महिन्यांचा रोखलेला महागाई भत्ता मिळू शकतो.
3 / 8
इंडियन पेन्शनर्स मंचने पीएम मोदींना केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनर्सना महागाई भत्ता आणि महागाई सवलतीची थकबाकी देण्याचे आवाहन केले आहे. त्यांनी पीएम मोदींना पत्र लिहून त्यांना या प्रकरणात मदत करण्यास सांगितले आहे.
4 / 8
ऑफिस मेमोरँडमच्या अर्थ मंत्रालयाच्या अंतर्गत खर्च विभागाने म्हटले आहे की, केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना मिळणारा डीए सध्याच्या 17 टक्के वरून मूळ वेतनाच्या 28 टक्के केला जाईल.
5 / 8
गेल्या वर्षी एप्रिलमध्ये, अर्थ मंत्रालयाने कोविड 19 साथीच्या आजारामुळे महागाई भत्ता (डीए) मध्ये 30 जून 2021 पर्यंत वाढ रोखली होती. 1 जानेवारी 2020 ते 30 जून 2021 पर्यंत डीए दर 17 टक्के होता.
6 / 8
नॅशनल काउन्सिल ऑफ जेसीएमचे सचिव (स्टाफ साइड) शिव गोपाल मिश्रा यांनी दिलेल्या माहितीनुसार, दीड वर्षांचा डीए एरिअर अद्याप मिळालेला नाही आहे. आता यासंदर्भात सरकारशी बातचीत सुरू आहे. त्यांच्या मते कर्मचाऱ्यांची वाढती मागणी लक्षात घेता सरकार लवकरच डीएची रक्कम जारी करेल.
7 / 8
कोरोना संकटामुळे आर्थिक फटका बसलेल्या कर्मचाऱ्यांना आता 7 व्या वेतन आयोगानुसार (7th pay commission latest update) मोठा दिलासा मिळाला होता. 1 जुलै 2021 पासून केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 17 टक्क्यांवरून 28 टक्के करण्यात आला आहे.
8 / 8
जुलै 2021 मध्ये केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी केंद्र सरकारने सरकारी कर्मचारी आणि निवृत्तीवेतनधारकांसाठी महागाई भत्ता 11 टक्क्यांनी वाढवून 28 टक्के करण्याचा निर्णय घेतला असल्याचे जाहीर केले होते. डीए आणि डीआर वाढीबरोबरच केंद्र सरकारनं कर्मचाऱ्यांसाठी इतर काही लाभांचीही घोषणा केली आहे.
टॅग्स :businessव्यवसायEmployeeकर्मचारी