शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

ड्रोन तयार करणाऱ्या कंपनीसाठी आली आनंदाची बातमी, शेअर बनला रॉकेट; 5 महिन्यांत पैसा डबल!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 11, 2023 10:40 AM

1 / 7
ड्रोन तयार करणारी कंपनी ड्रोन डेस्टीनेशन लिमिटेडसंदर्भात (Drone Destination Ltd) आनंदाची बातमी आली आहे. कंपनीला अॅग्रीकल्चर स्प्रे ड्रोन, अॅग्रीस्टार 2.0 सर्टिफिकेशन मिळाले आहे. यासंदर्भात कंपनीने शुक्रवारी माहिती दिली.
2 / 7
डीजीसीएकडून मिळालेल्या या मंजुरीनंतर ड्रोन उत्पादक कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त तेजी दिसून आली आहे. ड्रोन डेस्टीनेशन लिमिटेडचा शेअर शुक्रवारी 3 टक्क्यांहून अधिकची तेजी मिळविण्यात यशस्वी ठरला आहे.
3 / 7
आठवड्याच्या शेवटच्या व्यवहाराच्या दिवशी कंपनीचा शेअर एनएसईमध्ये 148.05 रुपयांवर खुला झाला होता. यानंतर बघता बघता कंपनीचा शेअर 153 रुपयांच्या इंट्रा-डे हायवर पोहोचला.
4 / 7
5 महिन्यांत पैसा दुप्पट - गेल्या 5 महिन्यांचा विचार करता, या कालावधीत कंपनीच्या शेएर्समध्ये 129 टक्क्यांहून अधिकची तेजी दिसून आली आहे. अर्थात पोझिशनल गुंतवणूकदारांचा पैसा 5 महिन्यांत दुप्पट अथवा डबल झाला आहे.
5 / 7
याच वर्षात आला होता IPO - ड्रोन डेस्टीनेशन लिमिटेडचा आयपीओ याच वर्षात 7 जुलै रोजी आला होता. कंपनीच्या आयपीओचा प्राइस बँड 62 रुपयांवरून 65 रुपये प्रति शेअर निर्धारित करण्यात आला होता. कंपनीने एका लॉटमध्ये 2000 शेअर ठेवले होते. यामुळे प्रत्येक गुंतवणूकदाराला किमान 1,30,000 रुपयांची गुंतवणूक करावी लागली होती.
6 / 7
Trendlyne च्या डेटानुसार, या शेअरमध्ये गेल्या एका महिन्यात 13 टक्क्यांची वाढ दिसून आली आहे. तर, गेल्या 3 महिन्यांत 15.5 टक्क्यांची वाढ दिसून आली आहे.
7 / 7
(टीप - येथे केवळ शेअरच्या परफॉर्मन्सची माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणुकीचा सल्ला नाही. शेअर मार्केटमधील गुंतवणूक ही जोखमीवर अवलंबून असते. त्यामुळे, गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आणि मार्गदर्शन घेणे अत्यंत आवश्यक आहे.)
टॅग्स :share marketशेअर बाजारStock Marketशेअर बाजारInvestmentगुंतवणूक