शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

New Wage Code : आता दर आठवड्याला मिळणार 3 दिवस सुट्टी, सरकारनं सांगितलं केव्हा लागू होणार नवा वेज कोड

By ऑनलाइन लोकमत | Published: April 28, 2022 1:13 PM

1 / 8
आपण नोकरी करत असाल तर, ही बातमी खास आपल्यासाठी आहे. देशात लवकरच चार लेबर कोड (श्रम संहिता) लागू होणार आहेत. यानंतर आपल्याला दर आठवड्याला तीन विकऑफ मिळायला सुरुवात होईल.
2 / 8
महत्वाचे म्हणजे, देशातील 90 टक्के राज्यांनी लेबर कोडच्या नियमांचा मसुदा तयार केला आहे. तो लवकरच लागू केला जाईल, असे केंद्र सरकारने म्हटले आहे.
3 / 8
सॅलरी आणि ऑफिसच्या वेळेतही होणार बदल - केंद्रीय कामगार मंत्री भूपेंद्र यादव यांनी यासंदर्भात माहिती दिली. हे चारही कामगार कायदे लवकरच लागू होतील, अशी आशा यादव यांनी व्यक्त केली आहे. नवा वेज कोड लागू झाल्यानंतर, सॅलरी आणि ऑफिस टायमिंगपासून ते PF रिटायरमेंटपर्यंतच्या नियमांत बद होणार आहेत. तसेच, नवा कायदा कामगार क्षेत्रातील काम करण्याची बदललेली पद्धत आणि किमान वेतनाची गरज सामावून घेण्यासाठी आहे, असेही ते म्हणाले.
4 / 8
असंघटित क्षेत्रात जवळपास 38 कोटी कामगार - केंद्र सरकारने यापूर्वीच कामगार कायद्यांच्या चारही संहितांसाठी नियमांचा मसुदा जारी केला आहे. यादव म्हणाले, सरकार देशातील सर्व कामगारांना सामाजिक सुरक्षा देण्याच्या दृष्टीने काम करत आहे. यामुळेच ई-श्रम पोर्टल अथवा असंघटित कामगारांचा राष्ट्रीय डेटाबेस तयार केला जात आहे. सरकारच्या अंदाजानुसार, देशात जवळपास 38 कोटी कामगार असंघटित क्षेत्रात काम करतात.
5 / 8
नवा वेज कोड लागू झाल्यानंतर होणार हे मोठे बदल : कामाचे तास वाढणार - नव्या वेज कोडमध्ये कामाचे तास (Working Hour) वाढवून 12 तास करण्याचा प्रस्ताव आहे. ते आठवड्यात 4-3 प्रमाणात विभागले आहेत. म्हणजेच 4 दिवस ऑफिस, 3 दिवस वीक ऑफ. याच बरोबर कर्मचाऱ्यांना दर पाच तासांनंतर 30 मिनिटांचा ब्रेक देण्याचाही प्रस्ताव आहे.
6 / 8
30 मिनिटे अधिक काम केल्यानंतर ओव्हरटाइम - नव्या वेज कोडमध्ये 15 ते 30 मिनिटे अधिक काम केल्यास ते 30 मिनिटे मोजून ओव्हरटाइममध्ये समाविष्ट करण्याचा प्रस्ताव आहे. सध्याच्या न‍ियमांत 30 मिनिटांपेक्षा कमी कालावधीस ओवरटाइम मानले जात नाही.
7 / 8
सॅलरी स्ट्रक्चरही बदलणार - नव्या वेज कोड अॅक्टनुसार (Wage Code Act), कुठल्याही कर्मचाऱ्याची बेसिक सॅलरी Cost To Company (CTC) च्या 50 टक्क्यांपेक्षा कमी असणार नाही. वेज कोड लागू झाल्यानंतर, कर्मचाऱ्यांची टेक होम सॅलरी (Take Home Salary) कमी होईल.
8 / 8
र‍िटायरमेंटनंतर मिळणार अधिक पैसे - पीएफ सोबतच ग्रॅच्‍युटीतील (Monthly Gratuity) योगदानही वाढेल. म्हणजेच टेक होम सॅलरी कमी होण्याचा फायदा पीएफ आणि रिटायरमेंटच्या दृष्टीने मिळेल. सॅलरी आणि बोनसशी संबंधित नियमही बदलतील.
टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीEmployeeकर्मचारीLabourकामगार