Good news for gold and silver buyers Big fall in prices, big changes happened on budget day itself
Gold Sliver Price Drop: सोनं-चांदी खरेदी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! किंमतीत मोठी घसरण, अर्थसंकल्पादिवशीच झाले मोठे बदल By ऑनलाइन लोकमत | Published: July 23, 2024 1:58 PM1 / 9सोनं- चांदी खरेदी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. आज केंद्रीय अर्थसंकल्प सादर झाला आहे. या अर्थसंकल्पात केंद्राने सोनं आणि चांदीवरील टॅक्स कमी करण्याचा निर्णय घेतला आहे, तर दुसरीकडे आज सोन्या चांदीच्या दरात घट झाल्याचे दिसत आहे.2 / 9सोन्या-चांदीच्या दरात आज २२ जुलै रोजी घसरण झाली आहे. इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशनच्या वेबसाइटनुसार, २४ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा भाव २३४ रुपयांनी घसरून ७३,००६ रुपयांवर आला आहे. काल त्याची किंमत ७३,२४० रुपये प्रति दहा ग्रॅम होती.3 / 9एक किलो चांदीची किंमत ६५५ रुपयांनी घसरून ८८,३२८ रुपये किलोवर विकली जात आहे. यापूर्वी चांदी ८८,९८३ रुपये प्रतिकिलो होती. या वर्षी चांदीने २९ मे रोजी प्रति शेअर ९४,२८० रुपयांचा सार्वकालिक उच्चांक गाठला होता.4 / 9दिल्लीत १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याची किंमत ६७,८५० रुपये आणि १० ग्रॅम २४ कॅरेट सोन्याची किंमत ७४,००० रुपये आहे.5 / 9मुंबईमध्ये १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याची किंमत ६७,७०० रुपये आणि १० ग्रॅम २४ कॅरेट सोन्याची किंमत ७३,८५० रुपये आहे. कोलकातामध्ये २२ कॅरेट सोन्याच्या १० ग्रॅमची किंमत ६७,७०० रुपये आणि २४ कॅरेट १० ग्रॅम सोन्याची किंमत ७३,८५० रुपये आहे.6 / 9चेन्नईमध्ये १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याची किंमत ६८,२५० रुपये आणि १० ग्रॅम २४ कॅरेट सोन्याची किंमत ७४,४५० रुपये आहे. भोपाळमध्ये १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याची किंमत ६७,७५० रुपये आणि १० ग्रॅम २४ कॅरेट सोन्याची किंमत ७३,९०० रुपये आहे.7 / 9यावर्षी आतापर्यंत सोन्याचा भाव प्रति १० ग्रॅम ९,६५४ रुपयांनी वाढला आहे. वर्षाच्या सुरुवातीला तो ६३,३५२ रुपये होता. जो आता ७३,००६ रुपये प्रति १० ग्रॅम आहे. 8 / 9वर्षाच्या सुरुवातीला चांदी ७३,३९५ रुपये प्रतिकिलो होती. जो आता ८८,३२८ रुपये प्रति किलोवर पोहोचला आहे. चांदीच्या दरात १४,९३३ रुपयांची वाढ झाली आहे.9 / 9येत्या एका वर्षात सोन्याच्या किमतीत वाढ होण्याची शक्यता आहे. अमेरिकन वित्तीय सेवा कंपनी सिटीबँकच्या अहवालानुसार, २०२५ च्या मध्यापर्यंत सोन्याची किंमत ३००० डॉलर प्रति औंस म्हणजेच ८८,४५० रुपये प्रति १० ग्रॅमपर्यंत पोहोचू शकते. आणखी वाचा Subscribe to Notifications