शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

सोनं -चांदी खरेदी करणाऱ्यांसाठी खुशखबर! दुसऱ्या दिवशीही दर कोसळले; वाचा आजचे दर

By ऑनलाइन लोकमत | Published: May 14, 2024 1:33 PM

1 / 8
गेल्या काही दिवसापासून सोन्या-चांदीच्या दरात वाढ झाल्याचे पाहायला मिळत होते. आता सोन्याच्या दरात मोठे बदल झाले आहेत.
2 / 8
आज सोन्याच्या दरात घट झाली आहे. भारतीय वायदे बाजारात एमसीएक्सवर सोन्याच्या दरात ४३० रुपयांची घट झाली आहे. आज मंगळवारी प्रति १० ग्रॅमसाठी सोन्याचा दर ७२,८२० रुपये इतका आहे. मागील सत्रात सोन्याचा दर ७३,२५० वर बंद झाला होता.
3 / 8
आज चांदीच्या दरात ५०१ रुपयांनी वाढून एक किलोसाठी ८५,३८७ रुपये प्रति किलोग्रॅम इतका आहे. तर, मागील सत्रात ८४,८८६ रुपये इतका चांदीचा दर होता.
4 / 8
आज अमेरिकेत प्रोड्युसर प्राइस इंडेक्स अमेरिकेत जाहीर होणार आहे. याधीच सोन्याच्या दरात घसरण झाली आहे. सुएस स्पॉट गोल्ड १ टक्क्यांनी घसरले आहे.
5 / 8
मुंबई - पुण्यात सोन्याचे दर?- २२ कॅरेट- ६६,७५० रुपये २४ कॅरेट- ७२,८२० रुपये १८ कॅरेट- ५४,६२० रुपये
6 / 8
आज मंगळवारी सोन्याच्या जागतिक किमतीत वाढ होताना दिसत आहे. कॉमेक्सवर सोन्याची जागतिक फ्युचर्स किंमत ०.२५ टक्क्यांनी व्यवहार करताना दिसत आहे.
7 / 8
सोन्याची जागतिक स्पॉट किंमत सध्या प्रति औंस २,३४३.६२ डॉलरवर व्यवहार करत असल्याचे दिसते.
8 / 8
अक्षय्य तृतीयेच्या आधी सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण झाली होती. मात्र, अक्षय्य तृतीयेपूर्वी सोन्या-चांदीत मोठी वाढ झाली होती. सोने महाग झाले होते.
टॅग्स :GoldसोनंSilverचांदीbusinessव्यवसाय