शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

NPS मध्ये गुतंवणूक करणाऱ्यांसाठी खुशखबर! तुम्ही गुंतवणूक कराल त्याच दिवशी तुम्हाला NAV चा लाभ मिळेल

By ऑनलाइन लोकमत | Published: July 28, 2024 3:23 PM

1 / 9
NPS : जर तुम्ही एनपीएस मध्ये गुंतवणूक करत असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. पेन्शन फंड नियामक आणि विकास प्राधिकरण NPS लोकांसाठी T+0 सेटलमेंट प्रणाली लागू करणार आहे.
2 / 9
आता ट्रस्टी बँकेकडून कोणत्याही सेटलमेंटच्या दिवशी सकाळी ११ (T) पर्यंत मिळालेले NPS योगदान त्याच दिवशी गुंतवले जाईल. यासह, NPS गुंतवणूकदारांना त्याच दिवशीच्या नेट ॲसेट व्हॅल्यूचा लाभ मिळेल.
3 / 9
निवेदनानुसार, ट्रस्टी बँकेकडून आत्तापर्यंत मिळालेल्या गुंतवणुकीचा दुसऱ्या दिवशी (T+1) भरले जातात. म्हणजे एक दिवस आधी मिळालेला हप्ता दुसऱ्या दिवशी गुंतवले जातात.
4 / 9
PFRDA ने सांगितले की, कोणत्याही सेटलमेंटच्या दिवशी सकाळी ९.३० पर्यंत मिळालेले योगदान त्याच दिवशी गुंतवणुकीसाठी आधीच विचारात घेतले होते. आता, सकाळी ११ वाजेपर्यंत मिळालेली योगदानाची रक्कम देखील लागू NAV सह त्याच दिवशी गुंतवली जाईल.
5 / 9
निवेदनानुसार, पीएफआरडीएने 'पॉइंट ऑफ प्रेझेन्स', नोडल ऑफिसेस आणि ई-एनपीएससाठी एनपीएस ट्रस्टना त्यांच्या एनपीएस ऑपरेशन्स सुधारित टाइमलाइनसह संरेखित करण्याचा सल्ला दिला आहे.
6 / 9
यामुळे ग्राहकांना योग्य मार्गाने लाभ घेता येणार आहे. यापूर्वी, जमा केलेले पैसे गुंतवण्याआधी एक दिवसाचे अंतर असायचे. कारण ते पुढील ट्रेडिंग दिवशी (T+1) गुंतवले जातात.
7 / 9
आता नवीन नियमांनुसार ही प्रणाली गुंतवणूकदारांसाठी पूर्वीपेक्षा चांगली झाली आहे. आता सकाळी ११ वाजेपर्यंत जमा केलेले डि-रिमिट पैसेही त्याच दिवशी गुंतवले जातील आणि तेही त्या दिवशी लागू होणाऱ्या नेट ॲसेट व्हॅल्यू (NAV) नुसार.
8 / 9
पेन्शन फंड रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट अथॉरिटी (PFRDA) ने एनपीएसमध्ये लवकर फायदे मिळण्यासाठी काही बदल केले आहेत. या बदलांनंतर, NPS मध्ये गुंतवणुकीची प्रक्रिया सुलभ आणि जलद होईल.
9 / 9
पेन्शन रेग्युलेटरने २०२३-२४ या वर्षात गैर-सरकारी क्षेत्रांमधून NPS मध्ये ९.४७ लाख नवीन ग्राहक जोडले, यामुळे NPS ची गुंतवणूक रक्कम ३०.५% ने वाढली. वार्षिक आधारावर ते ११.७३ लाख कोटी रुपये झाले. ३१ मे २०२४ पर्यंत NPS सदस्यांची एकूण संख्या १८ कोटी आहे. २० जून २०२४ पर्यंत, अटल पेन्शन योजना अंतर्गत एकूण नोंदणीने ६.६२ कोटी ओलांडले आहेत, त्यापैकी २०२३-२४ मध्ये १.२ कोटी पेक्षा जास्त नोंदणी झाली होती.
टॅग्स :Pensionनिवृत्ती वेतन