शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Good News! या बँकेकडून होमलोन घेतलेलं असल्यास ऑगस्टपासून तुमचा EMI होणार कमी

By ऑनलाइन लोकमत | Published: August 04, 2020 10:31 PM

1 / 7
कोरोना विषाणूच्या फैलावामुळे आरोग्यासोबत आर्थिक क्षेत्रासमोर मोठं संकट निर्माण झालेलं आहे. देशाच्या अर्थव्यवस्थेला अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्याचा फटका बँकिंग क्षेत्रालाही बसत आहे. दरम्यान, कोरोनामुळे निर्माण झालेल्या आर्थिक परिस्थितीचा परिणाम कर्जांवरील व्याजावरही झाला असून, विविध बँकांकडून कर्जांवरील व्याजदर कमी करण्यात येत आहेत.
2 / 7
दरम्यान, तुम्ही आयसीआयसीआय बँकेकडून होम लोक किंवा इतर कुठल्याही प्रकारचे कर्ज घेतलेले असेल तर तुमच्यासाठी दिलासादायक वृत्त आहे. कारण आयसीआयसीआय बँकेने व्याजदरात कपात केली आहे. बँकेने आपल्या मार्जिनल कॉस्ट ऑफ फंड्स बेस्ड लँडिग रेट (एमसीएलआर) च्या दरात १० बीपीएसने कपात केली आहे.
3 / 7
एमसीएलआरमध्ये झालेल्या कपातीमुळे आयसीआयसीआय बँकेच्या होमलोनच्या कर्जदारांच्या ईएमआयमध्ये घट होणार आहे. बँकेने दिलेल्या माहितीनुसार नवीन दर १ ऑगस्टपासून लादू झाले आहेत. त्यामुळे कर्जदारांना या महिन्यापासून कर्जाचा कमी हप्ता भरावा लागेल.
4 / 7
बँकेने सांगितले की होम लोनसोबत इतर सर्व प्रकारच्या कर्जांमध्येही कपात करण्यात आली आहे. कोरोनाच्या संकटामुळे आरबीआयने रेपो रेटमध्ये कपात केली होती. त्यानंतर बहुतांश बँकांनी होमलोनसह सर्वप्रकारची कर्जे स्वस्त केली आहेत.
5 / 7
व्याज दरांमधील १० बीपीएसच्या कपातीनंतर आता आयसीआयसीआय बँकेचा एक वर्षाचा एमसीएलआर घटून ७.४५ टक्के एवढाच राहिला आहे. यापूर्वी हा दर ७.५५ टक्के होता. आता बहुतांश बँकांचे कर्ज एमसीएलआरशी जोडले गेले आहेत.
6 / 7
यापूर्वी १४ जुलै रोजी आयसीआयसीआय बँकेने फिक्स डिपॉझिटच्या व्याजदरांमध्ये कपात केली होती. आता ही बँक एक वर्षाच्या एफडीवर ५.१५ टक्के एवढे व्याज देत आहे. तर ३ वर्षांपेक्षा अधिक काळाच्या एफडीवर ५.५० टक्के व्याज दर लागू आहे.
7 / 7
सध्या बहुतांश बँका आणि एनबीएफसी ६.९० टक्के दराने व्याज देत आहेत. कोरोनाच्या संकटामुले देशासमोर अनेक प्रकारची आर्थिक संकटं उभी राहिली आहेत. दरम्यान बाँकिंग क्षेत्राच्या मदतीने अर्थव्यवस्थेला पुन्हा एकदा रुळावर आणण्याचा सरकारचा प्रयत्न आहे.
टॅग्स :Banking Sectorबँकिंग क्षेत्रICICI Bankआयसीआयसीआय बँकHomeघर