शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

फायद्याची बातमी! २०० रुपये वाचवून गुंतवणूक करा, मॅच्युरिटीवर २८ लाख मिळतील; LIC ची जबरदस्त योजना

By ऑनलाइन लोकमत | Published: October 09, 2024 3:39 PM

1 / 10
LIC: आपल्याकडे अनेकांची एलआयसीमध्ये मोठी गुतंवणूक आहे. एलआयसीवर देशातील अनेक गुंतवणूकदारांचा विश्वास आहे.
2 / 10
एलआयसीकडे सुरक्षित गुंतवणूक म्हणून पाहिले जाते. एलआयसी आपल्या ग्राहकांसाठी नवीन योजना लाँच करत असते.
3 / 10
एलआयसीमध्ये गुंतवणूक करण्यासाठी जर तुमच्याकडे एकरकमी पैसे नसतील तर तुम्ही दररोज २०० रुपये साठवून गुंतवणूक करु शकता.
4 / 10
LIC ची ही योजना देशात खूप लोकप्रिय आहे. अनेकांनी यात गुंतवणूक वाढवली आहे.या योजनेचं नाव जीवन प्रगती असं आहे.
5 / 10
एलआयसीच्या जीवन प्रगती प्लॅनमध्ये गुंतवणुकीसाठी किमान वयोमर्यादा १२ वर्षे ठेवण्यात आली आहे.
6 / 10
कमाल वयोमर्यादा ४५ वर्षे निश्चित करण्यात आली आहे. या योजनेत गुंतवणूक केल्याने, तुम्हाला चांगल्या परताव्यासह आजीवन सुरक्षा मिळते.
7 / 10
LIC च्या जीवन प्रगती योजनेतील संरक्षण दर पाच वर्षांनी वाढतच जाते. योजनेअंतर्गत, विमाधारकाचा मृत्यू झाल्यास, विमा रक्कम, सिंपल रिर्व्हसरी बोनस अंतिम बोनस एकत्रितपणे दिले जातात.
8 / 10
तुम्ही दररोज २०० रुपयांची बचत करत असल्यास आणि एलआयसीच्या जीवन प्रगती योजनेत दरमहा ६,००० रुपये गुंतवल्यास, तुम्ही या योजनेत वार्षिक ७२,००० रुपये जमा कराल.
9 / 10
LIC ने ८ ऑगस्ट रोजी आपले तिमाही निकाल जाहीर केले आहेत. शेअर बाजाराला दिलेल्या माहितीत एलआयसीने सांगितले की, चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत कंपनीचा निव्वळ नफा (LIC Q1 net profit) 10 टक्क्यांनी वाढून 10,461 कोटी रुपये झाला आहे. तर गेल्या वर्षी याच कालावधीत (Q1FY24) हा 9,544 कोटी रुपये होता.
10 / 10
एलआयसीने गुरुवारी एक्सचेंज फाइलिंगमध्ये सांगितल्यानुसार, जून 2024 च्या तिमाहीत कंपनीचे एकूण उत्पन्न वाढून 2,10,910 कोटी रुपये झाले आहे, तर वर्षभरापूर्वी ते 1,88,749 कोटी रुपये होते. तसेच, पहिल्या वर्षाच्या प्रीमियम उत्पन्नाच्या (FYPI) बाबतीत, LIC भारताच्या जीवन विमा व्यवसायात अव्वल स्थानावर आहे. 30 जून 2024 रोजी संपलेल्या तिमाहीत, LIC चे एकूण मार्केट शेअर 64.02% आहे, जो मागील वर्षी याच कालावधीत (Q1FY24) 61.42% होते.
टॅग्स :LIC - Life Insurance Corporationएलआयसीbusinessव्यवसायInvestmentगुंतवणूक