Good news for LIC customers; Will save money from credit card
एलआयसी ग्राहकांसाठी खूशखबर; पैसे वाचणार By ऑनलाइन लोकमत | Published: December 04, 2019 7:53 PM1 / 6जर तुम्ही एलआयसी ग्राहक असाल तर तुमच्यासाठी चांगली बातमी आहे. एलआयसीने उशिरा का होईना डिजिटल पेमेंटला प्रोत्साहन देण्य़ासाठी एक खास सेवा देण्यास सुरूवात केली आहे. 2 / 6जर तुम्ही कधी क्रेडिट कार्डद्वारे एलआयसीचा हप्ता भरला असाल तर माहिती असेल की, सेवा शुल्क आकारले जात होते. एलआयसीकडून ही फी आकारली जात होती. 3 / 6मात्र आता 1 डिसेंबरपासून ही फी आकारली जाणार नसल्याने ग्राहकांचे पैसे वाचणार आहेत. पीटीआय़ने दिलेल्या वृत्तानुसार आतापासून क्रेडिट कार्डद्वारे रिन्यूअल प्रिमिअम, नवीन प्रिमिअम, कर्जाचा हप्ता, पॉलिसीवर दिले गेलेल्या कर्जाचे व्याज आदीवर कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही. 4 / 6एलआयसीनुसार देशातील सध्या अस्तित्वात असलेल्या पैसे घेण्याची यंत्रणा, कार्डलेस पेमेंट पॉईंट आणि पॉईंट ऑफ सेल मशीनद्वारे क्रेडिट कार्ड स्वाईप करून हप्ता देता येऊ शकणार आहे. 5 / 6याशिवाय एलआयसीने ग्राहकांना माय एलआयसी अॅप लाँच केले आहे. या अॅपद्वारे ग्राहक ऑनलाईन ट्रान्झेक्शन करू शकतात. 6 / 6नुकतेच एलआयसीने दोन वर्षांपेक्षा अधिक काळापासून लॅप्स झालेल्या ग्राहकांना पॉलिसी सुरू करण्य़ाची संधी दिली होती. आणखी वाचा Subscribe to Notifications