Good news! lost Money with LIC? Shares will rise, buying ratings from brokerage firms
LIC Shares Big Update: आनंदवार्ता! एलआयसीत पैसे बुडालेत? शेअर वाढणार, ब्रोकरेज फर्म्सकडून खरेदीचे रेटिंग By ऑनलाइन लोकमत | Published: July 05, 2022 4:17 PM1 / 8सरकारी विमा कंपनी एलआयसीने सामान्य पॉलिसीधारक गुंतवणूकदारांना चांगलेच धुपविले होते. एलआयसीच्या शेअरमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांचे चांगलेच पैसे बु़डालेले आहेत. अशावेळी या गुंतवणूकदारांनी आज ना उद्या वाढतील म्हणून आशेने हे शेअर्स ठेवले आहेत. अशा लोकांसाठी आनंदवार्ता आहे. 2 / 8 LIC IPO Investors निराश झाले होते. त्यांच्यासाठी ब्रोकरेज फर्म मोतीलाल ओस्वालने एलआयसी शेअरला बायची ('BUY') रेटिंग दिली आहे. याचाच अर्थ एलआयसीचे शेअर आता वाढण्याची शक्यता आहे. एलआयसीची एम्बेडेड व्हॅल्यूच्या ७० टक्के हिशेबाने एलआयसीचे मुल्यांकन बरोबर आहे. 3 / 8आज एलआयसीच्या शेअरने दुपारी १ वाजता उसळी घेतली. बीएसईवर हा शेअर 2.25 टक्क्यांच्या वाढीने ७०८ रुपयांवर ट्रेड करत होता. एक वेळ अशी होती की, हा शेअर ०३ टक्क्यांच्या वाढीने 712.50 रुपयांवर गेला होता. 4 / 8एलआयसी शेअरला मोतीलाल ओस्वालने टार्गेट प्राईज 830 रुपये एवढी दिली आहे. यानुसार एलआयसीचा शेअर येत्या काही दिवसांत २० टक्क्यांनी उसळी घेण्याची शक्यता आहे. 5 / 8एलआयसीच्या मार्जिनमध्ये हळूहळू पुनर्प्राप्ती होईल. 'वितरण, उत्पादनांचे मिश्रण, एकल प्रीमियमचे उच्च मिश्रण आणि समूह व्यवसायावर अवलंबित्व या बाबतीत खासगी कंपन्यांपेक्षा वेगळे धोरण ठेवले तरी एलआयसीने विमा बाजारात पहिले स्थान कायम ठेवले आहे, असे ओसवालने म्हटले आहे. 6 / 8एलआयसीचा शेअर 650 रुपयांच्या निचांकावर पोहोचला होता. त्याच्या तुलनेत सध्या हा शेअर ९ टक्क्यांनी मजबूत झाला आहे. तरी देखील एलआयसीचा मार्केट कॅप ५ लाख कोटी रुपयांपेक्षा कमीच आहे. आयपीओवेळी ही किंमत 6,00,242 कोटी रुपये होती. सध्या ही 4.47 लाख कोटी रुपये आहे. 7 / 8LIC च्या IPO साठी 902-949 रुपयांचा प्राइस बँड निश्चित करण्यात आला होता. पहिल्याच दिवशी, एलआयसीचा शेअर 13 टक्क्यांपर्यंत घसरला होता आणि शेवटी तो 8.62 टक्क्यांनी म्हणजेच 81.80 रुपयांनी 867.20 रुपयांवर स्थिरावला होता.8 / 8यानंतर हा शेअर कोसळतच गेला. शेअर बाजार सावरला तरी देखील एलआयसीचा शेअर वाढला नव्हता. सध्या इश्यू किमतीपेक्षा 25 टक्क्यांहून कमी आहे. काही दिवसांपूर्वी ब्रोकरेज फर्म एमके ग्लोबलने एलआयसीचे कव्हरेज सुरू केले. फर्मने एलआयसीला होल्ड रेटिंगसह 875 रुपयांची टार्गेट प्राईस दिली होती. आणखी वाचा Subscribe to Notifications