शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

गुडन्यूज! अटल पेन्शन योजनेची व्याप्ती वाढणार, दरमहा 5 ऐवजी 10 हजार रुपये मिळणार...

By ऑनलाइन लोकमत | Published: July 09, 2024 5:45 PM

1 / 6
Atal Pension Yojana : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात तिसऱ्यांदा एनडीए सरकार स्थापन झाले असून, येत्या 23 जुलै रोजी सरकारचा पहिला अर्थसंकल्प सादर होणार आहे. या अर्थसंकल्पात सामाजिक सुरक्षेतंर्गत येणाऱ्या योजनांची व्याप्ती वाढवली जाऊ शकते.
2 / 6
या योजनांमध्ये आयुष्मान भारत योजनेसह, अटल पेन्शन योजनेचाही समावेश आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण, या योजनांबाबत मोठी घोषणा करण्याची शक्यता आहे.
3 / 6
केंद्र सरकार अटल पेन्शन योजनेतील (APY) किमान पेआउट दुप्पट करू शकते. असे झाल्यास या योजनेच्या लाभार्थ्यांना दुप्पट पेन्शनचा लाभ मिळेल. सध्या या योजनेंतर्गत खाते उघडणाऱ्यांना 1,000 ते 5,000 रुपये मासिक पेन्शन मिळते.
4 / 6
मीडिया रिपोर्ट्सनुसार, सरकार अटल पेन्शन योजनेअंतर्गत मिळणारी रक्कम 5,000 वरुन वाढवून 10,000 रुपयांपर्यंत करणार आहे. या निर्णयामुळे देशातील वृद्धांना त्याचा थेट फायदा होईल. पण, मिळणारी पेंशन योजनेत गुंतवलेल्या रकमेवर अवलंबून असते.
5 / 6
दरम्यान, ही सामाजिक सुरक्षा योजना 2015 मध्ये सुरू करण्यात आली होती. या योजनेअंतर्गत, 18 ते 40 वर्षे वयोगटातील कोणत्याही व्यक्तीला दरमहा 42 ते 210 रुपये प्रीमियम जमा करता येतात.
6 / 6
वयाच्या 60 वर्षांनंतर त्या व्यक्तीला दरमहा 1000 ते 5000 रुपये मासिक पेन्शन मिळते. वाढत्या वयाबरोबर त्याचा प्रीमियमही वाढत जातो. 20 जूनपर्यंतच्या आकडेवारीनुसार अटल पेन्शन योजनेत एकूण 6.62 कोटी लोकांनी आपली खाती उघडली आहेत.
टॅग्स :businessव्यवसायInvestmentगुंतवणूकPensionनिवृत्ती वेतनCentral Governmentकेंद्र सरकारNirmala Sitaramanनिर्मला सीतारामनNarendra Modiनरेंद्र मोदी