शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Airtel Plan : एअरटेलकडून प्रीपेड ग्राहकांसाठी खुशखबर; चार लाखांचा विमा मोफत

By ऑनलाइन लोकमत | Published: November 04, 2019 6:29 PM

1 / 5
जिओकडून कडवी टक्कर मिळत असल्याने भारती एअरटेलने ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी अनोखी ऑफर आणली आहे. प्रीपेड ग्राहकांसाठी 4 लाखांचे विमाकवच प्रदान करण्याचा निर्यय कंपनीने घेतला आहे. भारती एएक्सएसोबत करार करण्यात आला आहे.
2 / 5
भारतात विमा घेणाऱ्यांची संख्या केवळ 4 टक्के आहे, तर मोबाईल वापरणाऱ्यांची संख्या ही खूपच मोठी आहे. यामुळे एअरटेलच्या ग्राहकांना विमा पुरविण्यात येणार असल्याचे एअरटेलने सांगितले.
3 / 5
यासाठी एअरटेलने 599 रुपयांच्या रिचार्जवर 84 दिवसांची व्हॅलिडीटी दिली आहे. तसेच हे रिचार्ज करणाऱ्या ग्राहकाला दिवसाला 2 जीबी डेटा आणि अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा देण्यात आली आहे. या प्लॅनसोबत एअरटेलने ग्राहकांना 4 लाखांचा विमा पुरविला आहे.
4 / 5
2022 मध्ये भारतात स्मार्टफोन वापरकर्त्यांची संख्या 83 कोटींवर जाण्याची शक्यता आहे. हा विमा 18 ते 54 वयोगटातील ग्राहकांसाठी लागू होणार आहे. हा विमा लागू करण्यासाठी रिचार्ज केल्यानंतर एसएमएस, एअरटेल अॅप किंवा गॅलरीमध्ये रजिस्टर करावे लागणार आहे.
5 / 5
हा विमा 84 दिवसांसाठी लागू राहणार असून विम्याची कॉपी ग्राहक घरीही मागवू शकणार आहेत.
टॅग्स :AirtelएअरटेलJioजिओ