शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

खूशखबर! टाटा मोटर्स 'वेगळा' आयपीओ आणण्याच्या तयारीत; १८ वर्षांनी येणार सुवर्णसंधी

By ऑनलाइन लोकमत | Published: July 08, 2022 5:45 PM

1 / 7
भारतीय शेअर बाजारात पेटीएम, झोमॅटो, एलआयसीच्या शेअरनी गटांगळ्या खाल्ल्या आहेत. अशावेळी टाटा मोटर्स तिच्या उपकंपनीचा आयपीओ आणण्याची तयारी करत आहे. टाटा ग्रुपमध्ये बऱ्याच वर्षांनी आयपीओ आणण्यात येणार आहे. कोरोना असो की युक्रेन युद्ध टाटाच्या शेअर्सनी कमालीची वाढ नोंदविली होती. यामुळे गुंतवणूकदारांना फायदा झाला होता.
2 / 7
गेल्या काही काळापासून शेअर बाजारात आलेल्या आयपीओंनी नुकसान केल्याने टाटाच्या या नव्या आय़पीओच्या बातमीने गुंतवणूकदारांत आनंदाचे भरते आले आहे. टाटा मोटर्सची उपकंपनी टाटा टेक्नॉलॉजीजचा आयपीओ लाँच करण्याची तयारी सुरु झाली आहे.
3 / 7
Tata Technologies ही जागतिक उत्पादन अभियांत्रिकी आणि डिजिटल सेवा कंपनी आहे. ऑटोमोटिव्ह, एरोस्पेस, इंडस्ट्रियल मशिनरी आणि इंडस्ट्रियल व्हर्टिकलमध्ये टाटा टेक्नॉलॉजीज उतरली आहे.
4 / 7
टाटा टेक्नॉलॉजीने आयपीओ लाँच करण्यासाठीचे सुरुवातीची तयारी सुरु केली आहे. कंपनी इलेक्ट्रीक वाहने आणि एव्हिएशनमध्ये वाढत्या मागणीला आधार धरणार आहे. मनीकंट्रोलला या घडामोडींशी संबंधित व्यक्तींनी ही माहिती दिली आहे.
5 / 7
टाटा टेक्नॉलॉजीजला हा आयपीओ आणण्यात यश आले तर, टीसीएसनंतर टाटा समूहाचा हा पहिला आयपीओ असेल. TCS IPO 2004 साली आला होता.
6 / 7
टीसीएसचा जेव्हा आयपीओ आलेला तेव्हा रतन टाटा टाटा समुहाचे अध्यक्ष होते. आता एन चंद्रशेखरन टाटा समुहाचे अध्यक्ष आहेत. त्यांच्या कार्यकाळातील हा पहिलाच आयपीओ असेल. या आयपीओबाबत अधिक माहिती समोर आलेली नाही. या आयपीओच्या लाँचिंगमध्ये देशातील तसेच परदेशातील बँकांचा सहभाग असण्याची शक्यता आहे.
7 / 7
टाटा टेक्नॉलॉजीज ही टाटा मोटर्सची सबसिडिअरी कंपनी आहे. टाटा मोटर्सची यामध्ये ७४ टक्के हिस्सेदारी आहे. 2021-22 मध्ये टाटा टेक्नॉलॉजीजचा महसूल 3529.6 कोटी रुपये होता. तर प्रॉफिट 645.6 कोटी रुपये होते.
टॅग्स :Tataटाटाshare marketशेअर बाजारIPOइनिशिअल पब्लिक ऑफरिंग