Good news The price of gold and silver fell during the wedding ceremony season check the latest rate
आनंदाची बातमी! लग्नसराईच्या काळात सोन्या-चांदीचा दर घसरला, पटापट चेक करा लेटेस्ट रेट! By ऑनलाइन लोकमत | Published: February 28, 2024 1:16 PM1 / 8लग्नसराईच्या काळात सोने-चांदी खरेदी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. आज सराफा बाजारात सोन्या-चांदीच्या दरात घसरण दिसून आली आहे. मंगळवारच्या बंद किमतीच्या तुलनेत, 24 कॅरेट सोने बुधवारी 20 रुपयांनी स्वस्त होऊन 62251 रुपये प्रति 10 ग्रॅमवर आले आहे. 2 / 8तर चांदीचा भावही प्रति किलो 466 रुपयांनी घसरला आहे. आज गोरखपूर, दिल्ली, मुंबई, लखनौ, जयपूर, इंदूर, कोलकाता आणि पाटण्यासह सर्व शहरांमध्ये सोने आणि चांदीच्या दरात घसरण दिसून आली आहे.3 / 8महत्वाचे म्हणजे आजचे हे दर इंडिया बुलियन अँड ज्वैलर्स असोसिएशनकडून (IBJA) जारी करण्यात आले आहेत. सोन्या-चांदीच्या या दरावर जीएसटी आणि ज्वेलरी मेकिंग चार्जस लावण्यात आलेले नाहीत. यामुळे आपल्या शहरांमध्ये सोना-चांदीचा दरात 1000 ते 2000 रुपयांपर्यंत अधिक असू शकतो.4 / 8आयबीजेएच्या नव्या दरांनुसार आता सोने आपल्या 4 डिसेंबर 2023 च्या ऑल टाईम हाय 63805 रुपयांच्या तुलनेत 1554 रुपये स्वस्त आहे. 5 / 8आज 28 फेब्रुवारीला सराफा बाजारात 23 कॅरेट गोल्डची सरासरी किंमत आता 20 रुपयांनी घसरून 62002 रुपये प्रति 10 ग्रॅमवर आली आहे. तर, 22 कॅरेट गोल्डची किंमत आता 18 रुपये प्रति 10 ग्रॅमने घसरून 57022 रुपये प्रति 10 ग्रॅमवर आली आहे. 6 / 8जीएसटी आणि ज्वेलरी मेकिंग चार्जस शिवाय 18 कॅरेट सोन्याच्या दारात 15 रुपये प्रति 10 ग्रॅमची घसरण नोंदवण्यात आली आहे. आता 18 कॅरेट सोन्याचा दर 46688 रुपये प्रति 10 ग्रॅमवर आला आहे.7 / 814 कॅरेट सोन्याचा विचार करता, यात 11 रुपये प्रति 10 ग्रॅमची घसरण नोंदवण्यात आली आहे. आज या सोन्याचा दर 36417 रुपये प्रति 10 ग्रॅम वर खुला झाला. 8 / 8तसेच चांदी 69436 रुपये प्रति किलो दराने खुली झाली आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications