शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Who is Shantanu Naidu: "गुडबाय माय डियर लाईट हाऊस"; टाटांसह सावली सारखा असणारा शंतनू नायडू कोण?

By ऑनलाइन लोकमत | Published: October 11, 2024 12:49 PM

1 / 8
Who is Shantanu Naidu: दिग्गज उद्योजक आणि टाटा समूहाचे मानद अध्यक्ष रतन टाटा यांचे वयाच्या ८६ व्या वर्षी निधन झालं. बुधवारी रात्री अकराच्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाने संपूर्ण देश शोकाकुल झाला असून सर्वांनीच त्यांना आदरांजली वाहिली. दरम्यान, रतन टाटा यांचे जवळचे मित्र आणि त्यांच्यासोबत सावलीसारखे असलेले शंतनू नायडू यांनीही त्यांच्यासाठी एक भावनिक पोस्ट लिहिली होती.
2 / 8
'त्यांच्या मैत्रीनं माझ्या आत एक पोकळी निर्माण झाली आहे, ती भरून काढण्याच्या प्रयत्नात मी आयुष्य घालवणार आहे. दु:ख ही प्रेमाची किंमत आहे. गुडबाय, माय डियर लाईटहाऊस,' असं शंतनू नायडू यांनं आपल्या पोस्टमध्ये म्हटलं होतं. शंतनू यांनं एक थ्रोबॅक फोटो देखील शेअर केला, ज्यामध्ये ते दोघे एकत्र दिसत आहेत.
3 / 8
वयाच्या ३१ व्या वर्षी शंतनू नायडूनं बिझनेस इंडस्ट्रीत जे स्थान मिळवलं आहे, जे अनेकांचं स्वप्न असतं. शंतनू नायडू रतन टाटांना स्टार्टअपमध्ये गुंतवणुकीसाठी बिझनेस टिप्स द्यायचा. शंतनूचा जन्म १९९३ मध्ये पुण्यात झाला. तो एक प्रसिद्ध भारतीय उद्योजक, इंजिनिअर, ज्युनिअर असिस्टंट, डीजीएम, सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर, लेखक आहे. शंतनू नायडू हा टाटा ट्रस्टचे डेप्युटी जनरल मॅनेजर आहेत.
4 / 8
प्राणीप्रेम आणि समाजसेवेची भावना असलेल्या शंतनूनं रस्त्यावर फिरणाऱ्या श्वानांसाठी मदत करणारी 'मोटोपॉज' नावाची संस्था तयार केली. स्टार्टअपनं भारतातील वाघांसाठी स्क्रॅप मटेरिअलपासून बनविलेले शिकारविरोधी उपकरण आणि रिफ्लेक्टिव्ह डॉग कॉलर तयार केले. यामुळे प्राण्यांशी संबंधित रात्रीच्या वेळी होणारे अपघात ३७ टक्क्यांनी कमी झाले.
5 / 8
शंतनूच्या नेतृत्वाखाली मोटोपॉजने १७ शहरांमध्ये विस्तार केला आणि ८ महिन्यांत २५० कर्मचाऱ्यांची नेमणूक केली. विद्यार्थी संघटना म्हणून सुरुवातीला त्यांच्याकडे कॉलर बनवण्यासाठी पुरेसा निधी नव्हता. त्यामुळे त्यांनी डेनिम पँटचा बेसिक मटेरियल म्हणून वापर करायचं ठरवलं, जे त्यांनी वेगवेगळ्या ठिकाणांहून गोळा केलं.
6 / 8
यानंतर त्यांनी २०२१ मध्ये गुडफेलो नावाचा उपक्रम सुरू केला, ज्याचा उद्देश वृद्धांना आधार देणे हा होता. याशिवाय शंतनूनं 'आय कम अपॉन अ लाईटहाऊस' हे पुस्तकही प्रकाशित केलं आहे. भटक्या कुत्र्यांसाठी रिफ्लेक्टर असलेल्या कॉलरबाबत फेसबुकवर केलेली पोस्ट पाहून रतन टाटा यांनी त्याला बैठकीसाठी मुंबईला बोलावलं होतं, तेव्हा शंतनू नायडू याचं स्वप्न पूर्ण झाले. इथूनच दोघांमध्ये घट्ट मैत्री सुरू झाली. कारण रतन टाटा स्वत: प्राणीप्रेमी होते.
7 / 8
दरम्यान, दोघांमधील सामाजिक प्रश्नांवरील समान मतांमुळे हे नातं आणखी घट्ट झाले. शंतनू आता रतन टाटांच्या कार्यालयात जनरल मॅनेजर म्हणून काम करतोय. तसंच टाटा समूहाला नवीन स्टार्टअपमध्ये गुंतवणूक करण्याचा सल्लाही देतो.
8 / 8
शंतनूने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून मेकॅनिकल इंजिनीअरिंगची पदवी घेतली. त्यानंतर त्यांनी २०१६ मध्ये कॉर्नेल विद्यापीठातून एमबीए केलं. शंतनू नायडू हा त्यांच्या कुटुंबातील पाचवी पिढी असून तो टाटा समूहात कार्यरत आहेत. लिंक्डइन प्रोफाइलनुसार शंतनू जून २०१७ पासून टाटा ट्रस्टमध्ये काम करत आहे. याशिवाय नायडू यांनी टाटा एलक्सीमध्ये डिझाइन इंजिनिअर म्हणूनही काम केले आहे.
टॅग्स :Ratan Tataरतन टाटाTataटाटाbusinessव्यवसाय