google now in talks to make several thousands of crore investment in airtel after jio
भन्नाट! Jio नंतर आता Google करणार Airtel मध्ये हजारो कोटींची गुंतवणूक; करार पूर्ण? By ऑनलाइन लोकमत | Published: August 29, 2021 9:04 PM1 / 10आताच्या घडीला टेलिकॉम कंपन्यांमध्ये तीव्र स्पर्धा असल्याचे पाहायला मिळत आहे. रिलायन्स Jio नंतर यात मोठी वाढ झाली होती. तसेच Vi कंपनीच्या २७ कोटी ग्राहकांवर टांगती तलवार असल्याचे दिसत आहे. 2 / 10अलीकडेच Google सारख्या जागतिक स्तरावरील बड्या कंपनीने रिलायन्स Jio मध्ये मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक केल्यानंतर आता Airtel सोबत करार करत असल्याची माहिती मिळाली आहे. 3 / 10Google आणि Airtel यांच्यातील करारानंतर सुनील मित्तल यांच्या नेतृत्वाखालील या दूरसंचार कंपनीसाठी हा मोठा दिलासा असेल, असे सांगितले जात आहे. मीडिया रिपोर्टनुसार, भारती एअरटेलला लवकरच गुगलकडून अनेक हजार कोटींची गुंतवणूक होऊ शकते. 4 / 10एका अहवालानुसार, दोन्ही कंपन्या गेल्या वर्षभरापासून चर्चा आणि वाटाघाटीच्या महत्त्वाच्या टप्प्यात आहेत. Airtel मध्ये Google ची गुंतवणूक खूप जास्त असू शकते. बिल्ट-इन मोबिलिटी काय आहे हे पाहणे बाकी आहे, कारण जिओ आणि गुगलच्या भागीदारी नंतर एअरटेल किंवा Vi सह त्यांच्या कोणत्याही स्पर्धकांमध्ये गुंतवणूक करण्यासाठी निर्बंध घालू शकतात, असे म्हटले जात आहे.5 / 10नुकताच Google ने Jio प्लॅटफॉर्ममध्ये ३४ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक केली होती. भारती Airtel आधीपासूनच पैसे गोळा करण्याच्या विचारात आहे, जेणेकरून ते देशभरात त्यांची 4G नेटवर्क क्षमता वाढवण्यासाठी गुंतवणूक करू शकतील.6 / 10Google आणि Airtel ने कथित कराराबाबत कोणतीही औपचारिक घोषणा केली नसली तरी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गुगलच्या आगमनामुळे एअरटेलची बॅलेन्स शीट मजबूत झाली आहे. गुगल एअरटेलला त्यांच्या रियलायजेशन आणि प्रॉफिटेबिलिटीमध्ये सुधारणा करण्यासाठी त्यांचा डेटा अधिक चांगल्या पद्धतीने मॉनिटाईज करण्यास मदत करेल.7 / 10तसेच, ही कंपनी भागीदार कंपनीला स्ट्रॅटजिकली मदत करते, कारण गुगल डेटा विश्लेषणाच्या बाबतील जगातील कोणत्याही मोठ्या कंपनीपेक्षा चांगली आहे. गुगलची मोठी गुंतवणूक भारती एअरटेलसाठी बरेच काही ठरवू शकते, असे सांगितले जात आहे. 8 / 10यामुळे टेलिकॉम कंपनीला सरकारचे कर्ज सहज फेडता येईल, सोबतच 4G आणि 5G नेटवर्कमध्ये गुंतवणूक करता येईल, असेही म्हटले जात आहे. दरम्यान, उद्योगपती मुकेश अंबानींचीरिलायन्स जिओ बाजारात पुन्हा एकदा धुमाकूळ घालण्याची शक्यता आहे. मुकेश अंबानींनी जिओच्या माध्यमातून दूरसंचार क्षेत्रात क्रांती घडवली. 9 / 10JioPhone Next ची निर्मिती रिलायन्स जिओकडून केली जात आहे. गुगलच्या सहकार्यानं फोन डेव्हलप करण्यात येत आहे. जिओफोन नेक्स्टची घोषणा जूनमध्ये झालेल्या रिलायन्सच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत करण्यात आली होती.10 / 10जिओफोन नेक्स्टची किंमत ३ हजार ४९९ रुपये असण्याची शक्यता आहे. त्याची विक्री सप्टेंबरपासून सुरू होऊ शकते. जिओमुळेच देशात स्वस्त इंटरनेट उपलब्ध झालं. त्यानंतर जिओने आपले फोनदेखील बाजारात आणले. आता जिओफोन नेक्स्टची भारतीय किंमत ऑनलाईन लीक झाली आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications