google pay now shows how much money you spent in 2020 check details
Google Pay वरुन २०२० या वर्षात तुम्ही किती खर्च केले? अशी मिळवा माहिती... By मोरेश्वर येरम | Published: January 02, 2021 3:49 PM1 / 6Spotify सारख्या अॅप्सने संपूर्ण वर्षभराचा आढावा एका क्लिकवर देण्याचा ट्रेंड सुरू केला. आता अनेक अॅप्लिकेशन्स यात सामील होऊन 'इयर-इन-रिव्ह्व्यू'चा पर्याय देत आहेत. यात गुगलची पेमेंट प्लॅटफॉर्म सेवा Google Pay म्हणजे Gpay चा देखील समावेश झाला आहे. 'गुगल पे'वर तुम्ही २०२० या वर्षात एकूण किती रुपये खर्च केलेत याची माहिती एका क्लिकवर मिळू शकते.2 / 6'इयर-इन-रिव्ह्यू' हा पर्याय तुम्हाला 'गुगल पे'मध्ये होम पेजवरच पाहायला मिळेल. 'रिसेंट ट्रान्झाक्शन'च्या पर्यायाच्या वर 'इयर-इन-रिव्ह्यू' हा पर्याय दिसेल. यावर क्लिक केल्यानंतर तुम्ही 'गुगल पे'वर किती दिवसांपासून सक्रीय झाले आहात याची माहिती मिळेल. 3 / 6'इयर-इन-रिव्ह्यू'मध्ये तुम्हाला विविध कार्ड्सच्या माध्यमातून गेल्या वर्षभरात तुम्ही केलेल्या सर्व व्यवहारांची माहिती दिली जाईल. याशिवाय, वर्षभरात कोणत्या महिन्यात तुम्ही किती रुपये खर्च केले याची सविस्तर माहिती येथे पाहायला मिळेल. 4 / 6गेल्या वर्षभरात Gpay च्या माध्यमातून तुम्ही किती जणांसोबत संवाद आणि व्यवहार केला आहे याचीही माहिती येथे मिळेल. यासोबतच कॅशबॅकच्या माध्यमातून तुम्ही वर्षभरात किती मिळकत केली याचीही माहिती मिळेल. 5 / 6शेवटच्या कार्डमध्ये तुम्ही वर्षभरात 'गुगल पे'चा वापर करुन नेमके किती रुपये खर्च केले आहेत याची माहिती मिळेल. यात प्रत्येक महिन्याची आकडेवारी पाहायला मिळेल. 6 / 6Gpay वरील ही सेवा १९ डिसेंबरपर्यंतच्या तुमच्या व्यवहारांची माहिती देईल. यानंतरच्या व्यवहारांची माहिती यात मिळणार नाही. आणखी वाचा Subscribe to Notifications