शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Fixed Deposit : तुम्ही Google Pay युझर आहात का? आता बुक करू शकाल FD; पाहा डिटेल्स

By ऑनलाइन लोकमत | Published: August 26, 2021 5:11 PM

1 / 10
लवकरच Google Pay युर्झ आपल्या फिनटेक पार्टनरच्या माध्यमातून फिक्स्ड डिपॉईड (FD) ऑनलाईन बुक करू शकणार आहेत.
2 / 10
मिंटच्या एका रिपोर्टनुसार Google ने आपल्या युझर्सना Google Pay च्या माध्यमातून FD बुक करण्याची परवानगी देण्यासाठी अॅप्लिकेशन प्रोग्रामिंग इंटरफेस प्रदान करण्यासाठी एक फिनटेकसोबत काम करणार आहे.
3 / 10
Google Pay वापरकर्ते इक्विटास स्मॉल फायनान्स बँकेकडे एक वर्षाच्या कालावधीसाठी FD बुक करू शकतात. त्यांना जास्तीत जास्त व्याज दर 6.35%मिळेल.
4 / 10
तथापि, ज्यांना या सुविधेचा लाभ घ्यायचा आहे त्यांना आधार-आधारित KYC वन-टाइम पासवर्ड (ओटीपी) द्वारे पूर्ण करावे लागेल.
5 / 10
अहवालानुसार, मिंटने एपीआयच्या बीटा आवृत्तीचा रिव्ह्यू केला आहे. मिंटनं एका अज्ञात व्यक्तीच्या हवाल्यानं सांगितलं की या सिस्टमची चांगली बाब म्हणजे तुम्ही इक्विटास स्मॉल फायनॅन्स बँकेत बचत खातं नसेल तरीही Google Pay वर FD बुक करू शकता.
6 / 10
पैसे तुमच्या सध्याच्या बचत खात्यातूनच काढले जातील आणि नंतर ते तुमच्या बचत खात्यातच परत केले जातील. उज्जीवन स्मॉल फायनॅन्स बँक आणि एयू स्मॉल फायनॅन्स बँकसहित अन्य बँकाही पाईपलाईनमध्ये आहेत.
7 / 10
हे यशस्वी झाल्यास, सिस्टमला अन्य अॅप्सपर्यंत विस्तारित केलं जाईल. सामान्यत: सर्वांचं लक्ष हे म्युच्युअल फंड आणि स्टॉक वर असतं. भारतात एफडी हा सर्वात मोठा घटक आहे.
8 / 10
एपीआयचं बीटा व्हर्जन ७-२९ दिवस, ३०-३५ दिवस, ४६-९० दिवस, ९१-१८० दिवस, १८१-३६४ दिवस आणि ३६५ दिवस अशा कालावधींची एफडी प्रदान करते. यामध्ये व्याज दर ३.५ टक्क्यांपासून ६.३५ टक्क्यांपर्यंत आहे.
9 / 10
सध्या छोट्या बँका अधिक व्याज देणारी बचत खाती आणि फिक्स्ड डिपॉझिटसाठी फिनटेकसोबत भागीदारी करत आहेत.
10 / 10
नुकतंच इक्विटास स्मॉल फायनॅन्स बँकेने १ लाख रूपयांपेक्षा अधिक रकमेसाठी ७ टक्के व्याजदरासोबत बचत खातं देण्यासाठी NiYO आणि Freo (मनीटॅप) सारख्या कंपन्यांसोबत भागीदारी केली आहे.
टॅग्स :google payगुगल पेMONEYपैसाInvestmentगुंतवणूकIndiaभारत