शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Google Pixel 7 आणि Pixel 7 Pro च्या खरेदीसाठी ग्राहकांची झुंबड, असे वाचवा ८,५०० रूपये

By ऑनलाइन लोकमत | Published: October 14, 2022 11:23 AM

1 / 8
Google Pixel 7 आणि Pixel 7 Pro हे दोन्ही स्मार्टफोन या महिन्याच्या सुरुवातीला लाँच करण्यात आले होते आणि आता या दोन्ही Pixel स्मार्टफोनची Flipkart वर विक्री सुरू करण्यात आली आहे. कंपनीने हे नवे Pixel फोन सेकंड जनरेशनच्या Tensor G2 चिपसेटसह बाजारात आणल आहेत.
2 / 8
एवढेच नाही तर या स्मार्टफोन्समध्ये आणखी एक गोष्ट आहे जी सर्वात खास आहे आणि ती म्हणजे कंपनी या दोन्ही स्मार्टफोन्सना 5 वर्षांपर्यंत सिक्युरिटी अपडेट मिळत राहणार आहे. Google Pixel 7 आणि Google Pixel 7 Pro च्या भारतातील किंमत. फीचर्स आणि ऑफर्सबद्दल अधिक माहिती पाहू.
3 / 8
पिक्सल 7 ची किंमत 59,999 रुपये ठेवण्यात आली आहे. हा स्मार्टफोन तीन रंगांमध्ये उपलब्ध आहे. तर Pixel 7 Pro ची किंमत 84,999 रुपये ठेवण्यात आली आहे. हा फोनदेखील तीन रंगांमध्ये खरेदीसाठी उपलब्ध असेल.
4 / 8
उपलब्धतेबद्दल बोलायचे झाले तर, दोन्ही स्मार्टफोन्स फ्लिपकार्टवर विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात आले होते, परंतु या दोन्ही स्मार्टफोन्सना ग्राहकांचा एवढा मोठा प्रतिसाद मिळाला आहे की, विक्री सुरू होताच ग्राहक हे स्मार्टफोन खरेदी करण्यासाठी तुटून पडले आणि लगेचच हे स्मार्टफोन्स आऊट ऑफ स्टॉकही झाले होते.
5 / 8
Pixel 7 सोबत 6 हजार रूपये आणि Pixel 7 Pro सोबत 8500 रूपयांचा कॅशबॅक देण्यात येत आहे. परंतु ही ऑफर कधीपर्यंत सुरू राहणार आहे हे मात्र स्पष्ट करण्यात आलेलं नाही. तसंच ग्राहकांना नो कॉस्ट ईएमआयदेखील उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. तसंच या स्मार्टफोन्सवर बँक ऑफरही देण्यात येत आहे.
6 / 8
पिक्सल 7 मध्ये 6.32-इंचाचा full-HD+ pOLED स्क्रीन देण्यात आली आहे. याचा रिफ्रेश रेट 90Hz आहे. तसंच यात गोरिला ग्लास 7 चे संरक्षण दिले आहे. Tensor G2 चिपसेट देण्यात आला असून 8GB रॅम आणि 128, 256GB पर्यंत मेमरी देण्यात आली आहे. पिक्सलचे फोन हे फोटोग्राफीसाठी ओळखले जातात.
7 / 8
मागे ड्युअल कॅमेरा देण्यात आला असून प्रायमरी सेन्सर हा 50 मेगापिक्सल आणि दुसरा 12 मेगापिक्सलचा अल्ट्रा-वाइड असणार आहे. सेल्फीसाठी सुद्धा पुढे दोन कॅमेरे देण्यात आले आहेत. 10 आणि 8 मेगापिक्सलचे हे कॅमेरे असणार आहेत. तसेच 4,355mAh ची वायरलेस चार्जिंग सपोर्टची बॅटरी देण्यात आली आहे. 
8 / 8
Pixel 7 Pro मध्ये 6.7-इंचची pOLED स्क्रीन 120Hz रिफ्रेश रेटची देण्यात आली आहे. 12GB पर्यंत रॅम आणि 256GB पर्यंत स्टोरेज स्पेस देण्यात आले आहे. पाठीमागे ट्रिपल कॅमेरा सेटअप असून प्रायमरी सेन्सर हा 50 मेगापिक्सल आणि दुसरा 12 मेगापिक्सलचा अल्ट्रा-वाइड आहे, तर तिसरी 48-मेगापिक्सल टेलिफोटो लेन्स देण्यात आली आहे. पुढे पिक्सल ७ प्रमाणेच सेल्फी कॅमेरे आहे. 5,000mAh ची वायरलेस चार्जिंग सपोर्टची बॅटरी देण्यात आली आहे. या फोनला IP68 रेटिंग आहे. 
टॅग्स :googleगुगलSmartphoneस्मार्टफोन