Got Covid vaccine This bank is giving higher interest on FD for getting vaccinated
Immune India Deposit Scheme: आपल्या पैशांवर अधिक व्याज हवंय?, तर घ्या कोरोनाची लस; 'या' सरकारी बँकेनं आणली नवी स्कीम By ऑनलाइन लोकमत | Published: April 13, 2021 12:06 PM1 / 15Immune India Deposit Scheme: काय तुम्ही कोरोना प्रतिबंधात्मक लस घेतली आहे? जर नसेल घेतली तर लवकरात लवकर नोंदणी करा आणि लस घ्या.2 / 15सार्वजनिक क्षेत्रातील एक बँक कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण करणाऱ्या लोकांच्या पैशांवर अधिक व्याज देत आहे. 3 / 15सार्वजनिक क्षेत्रातील बँक सेंट्रल बँक ऑफ इंडियानं (Central Bank of India) या योजनेची सुरूवात केली आहे. 4 / 15कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणाबाबत लोकांना प्रोत्साहित करण्यासाठी बँकेनं ही स्कीम सुरू केली आहे. 5 / 15सोमवारी सेंट्रल बँकेनं आपल्या या नव्या योजनेची घोषणा केली. बँकेनं या योजनेला इम्यून इंडिया डिपॉझिट स्कीम (Immune India Deposit Scheme) सुरू केली आहे.6 / 15सेंट्रल बँक ऑफ इंडियाची ही डिपॉझिट स्कीम ११११ दिवसांनी मॅच्युअर होईल. बँकेनं कोरोना काळात लोकांना लसीकरणासाठी प्रोत्साहित करण्यासाठी ही योजना आणली आहे.7 / 15जास्तीत जास्त लोकांनी लसीकरण करून घ्यावं आणि कोरोनाचा प्रादुर्भाव पसरण्यापासून रोखावा असं या स्कीमचं उद्दिष्ट्य आहे. 8 / 15सेंट्रल बँकेच्या या स्कीम अंतर्गत ज्या ग्राहकांनी लस घेतली आहे त्यांना सध्याच्या दरापेक्षा अधिक व्याजदर देण्यात येणार आहे. 9 / 15ज्या ग्राहकांनी लस घेतली आहे आणि जे पैस गुंतवतील अशा ग्राहकांना ०.२५ टक्के अधिक व्याज दिलं जाणार आहे.10 / 15या योजनेचा लाभ घेण्यासाठी बँकेनं लसीकरण मोहिमेचा लाभ घेण्याचं ग्राहकांना आवाहन केलं आहे. 11 / 15ज्येष्ठ नागरिकांना या स्कीमअंतर्गत अतिरिक्त ०.२५ टक्क्यांचा फायदा मिळणार असल्याची घोषणाही बँकेनं केली आहे. 12 / 15देशात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. दिल्ली आणि मुंबईसारख्या शहरांना कोरोनाचा मोठा फटका बसला आहे.13 / 15दिल्लीत कोरोनाची चौथी लाट आल्याचं म्हटलं जात आहे. तर मुंबई आणि महाराष्ट्रातही परिस्थिती बिकट झाली असून पुन्हा लॉकडाऊन लावण्याची वेळ आली आहे.14 / 15आतापर्यंत देशात १.३५ कोटीपेक्षा अधिक लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. यामध्ये १.७० लाख लोकांचा आतापर्यंत मृत्यूही झाला आहे. 15 / 15देशात कोरोनाचा अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या १२ लाखांच्यावर गेली असून कोरोनाच्या प्रादुर्भावापासून पहिल्यांदाच ही संख्या इतक्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications