Government employees will get a gift before Diwali There may be a large increase in DA
दिवाळीपूर्वी सरकारी कर्मचाऱ्यांना मिळणार पगारवाढ? डीएमध्ये मोठी वाढ होऊ शकते By ऑनलाइन लोकमत | Published: October 12, 2023 1:24 PM1 / 9या वर्षी दिवाळीपूर्वी केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी येऊ शकते. त्यांच्या पगारात मोठी वाढ होऊ शकते. केंद्र सरकार आपल्या कर्मचाऱ्यांना महागाई भत्त्यात भेट देऊ शकते.2 / 9याआधी दसऱ्यापर्यंत याची घोषणा होणे अपेक्षित होते, पण आता वृत्तांद्वारे प्राप्त होत असलेल्या अपडेट्सनुसार, सरकार केंद्रीय कर्मचाऱ्यांना दिवाळीत मोठी भेट देऊ शकते. 3 / 9नरेंद्र मोदी सरकारने केंद्रीय कर्मचार्यांचा महागाई भत्ता ४ टक्क्यांनी वाढवला तर तो सध्याच्या ४२ टक्क्यांवरून ४६ टक्के होईल. महागाई भत्ता वाढल्याने कर्मचाऱ्यांच्या पगारातही वाढ होणार आहे. मात्र, अद्याप कर्मचाऱ्यांच्या डीए वाढीबाबत सरकारकडून कोणतेही वक्तव्य किंवा प्रतिक्रिया आलेली नाही. 4 / 9सरकार केंद्रीय कर्मचाऱ्यांना देण्यात येणाऱ्या महागाई भत्त्यात वर्षातून दोनदा सुधारणा करते. ज्याचा लाभ त्यांना १ जानेवारी व १ जुलैपासून दिला जातो. २०२३ साठी, सरकारने पहिली दुरुस्ती करून २४ मार्च २०२३ रोजी डीए वाढीची घोषणा केली होती आणि त्यानंतर १ जानेवारी २०२३ पासून कर्मचारी आणि पेन्शनधारकांना वाढीव महागाई भत्त्याचा लाभ मिळत आहे. 5 / 9त्यानंतर केंद्राने कर्मचाऱ्यांना दिला जाणारा ३८ टक्के डीए ४ टक्क्यांनी वाढवून ४२ टक्के केला होता. आता सरकारने दिवाळीच्या दिवशी महागाई भत्ता वाढवला तर त्याचा लाभ कर्मचाऱ्यांना १ जुलै २०२३ पासून मिळणार आहे.6 / 9सरकारी कर्मचारी ४ टक्क्यांच्या डीए वाढीची मागणी करत आहेत. कर्मचार्यांच्या पगाराचा डीए हा महत्त्वाचा भाग असून त्यात वाढ झाल्याचा थेट परिणाम कर्मचार्यांना मिळणाऱ्या पगारावर होतो.7 / 9महागाई जितकी जास्त असेल तितकी कर्मचाऱ्यांच्या डीएमध्ये वाढ अपेक्षित आहे. यासाठी CPI-IW डेटा मानक मानला जातो. जुलै 2023 मध्ये, CPI-IW ३.३ अंकांनी वाढून १३९.७ वर पोहोचला होता. वर्षभरापूर्वीच्या याच कालावधीशी तुलना केल्यास ती सुमारे ०.९० टक्के अधिक होती.8 / 9यापूर्वी जून २०२३ मध्ये ते १३६.४ होते आणि मे महिन्यात ते १३४.७ होते. ऑगस्टमध्ये ०.५ टक्क्यांची घसरण नोंदवली गेली आहे आणि ती १३९.२ टक्क्यांवर आली आहे. अजूनही मे-जून महिन्याच्या तुलनेत खूपच जास्त आहे. अशा परिस्थितीत सरकार ४ ऐवजी ३ टक्के वाढ देऊ शकते, म्हणजेच महागाई भत्ता ४२ वरून ४५ टक्क्यांपर्यंत वाढण्याची शक्यता आहे.9 / 9सरकारने केंद्रीय कर्मचार्यांचा महागाई भत्ता ३ टक्क्यांनी वाढवला तर १८,००० रुपये मूळ वेतन असलेल्या कर्मचाऱ्याचा महागाई भत्ता ७,५६० रुपयांवरून ८,१०० रुपयांपर्यंत वाढेल. म्हणजेच त्यांच्या पगारात थेट ५४० रुपयांची वाढ होणार आहे. ४ टक्के वाढीच्या आधारे बघितले तर महागाई भत्ता ८,२८० रुपये आणि पगार ६९० रुपयांनी वाढेल. आणखी वाचा Subscribe to Notifications