शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

सरकारचं जनतेला न्यू ईयर गिफ्ट, सुकन्या समृद्धी योजनेसह छोट्या बचत योजनांवरील व्याजदरात वाढ

By ऑनलाइन लोकमत | Published: December 30, 2023 9:26 AM

1 / 6
केंद्र सरकारनं जनतेला नवीन वर्षापूर्वी मोठी भेट दिली आहे. नवीन वर्षाच्या आधी, शुक्रवारी, सरकारनं सुकन्या समृद्धी योजना (SSY), जानेवारी-मार्च २०२४ तिमाहीसाठी ३ वर्षांच्या मुदत ठेवीसारख्या काही छोट्या बचत योजनांचे (Small Savings Schemes) व्याजदर वाढवले ​​आहेत.
2 / 6
एका अधिसूचनेत केंद्रीय अर्थ मंत्रालयाने म्हटले आहे की, सुकन्या समृद्धी योजना (SSY) आणि तीन वर्षांच्या मुदत ठेव (Time Deposit) योजनेवरील व्याजात किरकोळ वाढ करण्यात आली आहे. तर अनेक लहान बचत योजनांचे व्याजदर कायम ठेवण्यात आले आहेत.
3 / 6
केंद्र सरकारने आता सुकन्या समृद्धी योजनेचा व्याजदर वाढवून ८.२ टक्के केला आहे, तर तीन वर्षांच्या मुदत ठेवीचा व्याजदर ७.१ टक्के केला आहे.
4 / 6
यापूर्वी सुकन्या समृद्धी योजनेचा व्याज ८ टक्के आणि तीन वर्षांच्या मुदत ठेवीचा व्याज ७.१ टक्के होता. सार्वजनिक भविष्य निर्वाह निधीच्या म्हणजेच पीपीएफच्या (PPF) व्याजदरात गेल्या तीन वर्षांपासून कोणताही बदल झालेला नाही.
5 / 6
PPF च्या व्याजातील शेवटचा बदल एप्रिल-जून २०२० मध्ये झाला होता, जेव्हा तो ७.९ टक्क्यांवरून ७.१ टक्के करण्यात आला होता. गेल्या वेळी केंद्र सरकारने पाच वर्षांच्या आरडी स्कीममध्ये कोणताही बदल केला नव्हता. या घोषणेपूर्वी केंद्र सरकारच्या स्मॉल सेव्हिंग स्कीमचे व्याजदर ४ टक्के ते ८.२ टक्के दरम्यान होते.
6 / 6
छोट्या बचत योजनांतर्गत, जानेवारी-मार्च २०२४ या तिमाहीसाठी केवळ सुकन्या समृद्धी योजनेवर (SSY) व्याज आणि ३ वर्षांच्या मुदतीच्या ठेवींमध्ये वाढ करण्यात आली आहे. इतर सर्व छोट्या बचत योजनांच्या व्याजदरात कोणतेही बदल करण्यात आलेले नाहीत. दरम्यान, पोस्ट ऑफिस टाइम डिपॉझिट स्कीमवरील व्याज हे बँक एफडीवरील व्याजापेक्षा अधिक आहे.
टॅग्स :GovernmentसरकारInvestmentगुंतवणूक