शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Gram Ujala Yojana : या योजनेअंतर्गत तुम्ही फक्त 10 रुपयांमध्ये LED बल्ब खरेदी करू शकता, जाणून घ्या योजनेबद्दल...

By ऑनलाइन लोकमत | Published: January 24, 2022 5:23 PM

1 / 7
लोकांना मूलभूत सुविधा मिळाव्यात या उद्देशाने शासनाकडून वेळोवेळी अनेक नवीन योजना सुरू केल्या जातात. याच अनुषंगाने सरकारकडून आणखी एक योजना राबविण्यात येत आहे. ही योजना सध्या केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी योजनांपैकी एक आहे.
2 / 7
ग्राम उजाला योजना असे या नाव आहे. या योजनेंतर्गत देशातील प्रत्येक घरात एलईडी बल्ब पोहोचावेत यासाठी सरकारकडून प्रयत्न केले जात आहेत. विशेष म्हणजे या योजनेंतर्गत सरकारकडून ग्रामीण भागातील लोकांना अवघ्या 10 रुपयांत एलईडी बल्बचे वाटप केले जात आहे.
3 / 7
प्रत्यक्षात, ग्राम उजाला योजनेअंतर्गत सरकारी कंपनी कन्व्हर्जन्स एनर्जी सर्व्हिसेस लिमिटेड (CESL) द्वारे आतापर्यंत 50 लाख एलईडी बल्ब वितरित केले गेले आहेत.
4 / 7
ही योजना आत्तापर्यंत उत्तर प्रदेश, बिहार, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि कर्नाटक या देशातील मोठ्या भागांतील ग्रामीण भागात लागू करण्यात आली आहे. मार्च 2021 मध्ये, कन्व्हर्जन्स एनर्जी सर्व्हिसेस लिमिटेडने अत्यंत किफायतशीर दरात म्हणजेच फक्त 10 रुपयांमध्ये एलईडी बल्ब वितरित करण्याचे काम सुरू केले.
5 / 7
एवढेच नाही तर कन्व्हर्जन्स एनर्जी सर्व्हिसेस लिमिटेडने या योजनेअंतर्गत एका दिवसात 10 लाख एलईडी बल्बचे वाटप केले होते. दरम्यान, ग्राम उजाला योजनेंतर्गत सरकार जुन्या बल्बऐवजी 7 वॅट आणि 12 वॅटचे चांगल्या दर्जाचे एलईडी बल्ब केवळ 10 रुपयांमध्ये तीन वर्षांच्या गॅरंटीसह लोकांना देत आहे.
6 / 7
त्याचबरोबर या योजनेत एका कुटुंबाला जास्तीत जास्त 5 बल्ब दिले जातात. विशेष म्हणजे ग्राम उजाला योजनेंतर्गत एलईडी बल्बच्या वितरणामुळे दरवर्षी सुमारे 72 कोटी युनिट विजेच्या वापरात घट झाली आहे.
7 / 7
त्यामुळेच ग्रामीण भागातील वीज बिलात सुमारे 250 कोटी रुपयांची घसरण झाली आहे. हे सरकारद्वारे माफ केले आहे. याचबरोबर, ही योजना सरकारद्वारे मार्च 2022 पर्यंत लागू केली आहे. मात्र, या योजनेचे फायदे पाहता सरकार त्याची मुदत आणखी वाढवू शकते, अशीही अपेक्षा आहे.
टॅग्स :businessव्यवसायMONEYपैसा