grant thornton bharat report claims that pmay creates over 1 2 cr employment opportunities
PMAY: संकटात दिलासा! PM आवास योजनेतून आतापर्यंत सुमारे १.२ कोटी रोजगार: रिपोर्ट By ऑनलाइन लोकमत | Published: May 31, 2021 6:34 PM1 / 10केंद्र सरकार गोरगरीब, मागासवर्गीय जनतेसाठी अनेकविध योजना राबवत असते. या योजनांच्या माध्यमातून या वर्गाचा, समाजाचा विकास व्हावा, त्यांना अन्य समाजासोबत जाता यावे, असा उद्देश यामागे असतो. 2 / 10अशीच एक योजना म्हणजे पंतप्रधान आवास योजना. केंद्र सरकारची राष्ट्रीय पातळीवरील योजना असलेल्या पंतप्रधान आवास योजनेत १ कोटी २० लाखांहून अधिक रोजगार निर्माण झाल्याचा दावा एका अहवालात करण्यात आला आहे.3 / 10या योजनेत गरिबांसाठी घरे बांधून दिली जातात. ग्रँट थॉर्टन भारत या संस्थेच्या 'परवडणारी घरे' या अहवालात पंतप्रधान आवास योजनेमुळे निर्माण झालेल्या रोजगारांचा मागोवा घेण्यात आला आहे. 4 / 10 ही योजना २१ विविध औद्योगिक क्षेत्रांशी निगडित आहे. त्याशिवाय २५० हून अधिक उद्योगांशी संलग्न आहे. यामध्ये स्टील, वीट निर्मिती, सिमेंट, रंग, हार्डवेअर आणि सॅनिटरी सारखे उदयोग या योजनेशी संबंधित आहेत. 5 / 10त्यामुळे पंतप्रधान आवास योजनेत लाखो कामगारांच्या हाताला काम मिळाले असल्याचे या अहवालात म्हटले आहे. प्रधान मंत्री आवास योजनेत (PMAY) योजनचा ५.८ लाख ज्येष्ठ नागरिकांना लाभ मिळाला आहे.6 / 10तसेच २ लाख बांधकाम मजूर, १.५ स्थानिक कामगार आणि १.५ कारागिरांना या योजनेचा लाभ मिळाला असल्याचे अहवालात म्हटले आहे. गृहनिर्माण क्षेत्रात झालेल्या गुंतवणुकीने या व्यवसायात प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष परिणाम झाले आहेत.7 / 10ग्रँट थॉर्टन भारत एलएलपीचे पार्टनर टी. रविंदर रेड्डी यांनी सांगितले की, यामुळे अर्थव्यवस्थेतील इतर क्षेत्राला लाभ झाला आहे. अर्थव्यवस्थेतील विविध उद्योग संलग्न असल्याने एका उद्योगात केलेल्या गुंतवणुकीचा लाभ इतरांना होतो. 8 / 10सिमेंट आणि स्टील उद्योगाला याचा मोठा फायदा झाला. या योजनेत घरांना परवानगी देण्यात आल्यानंतर त्यासाठी लागणाऱ्या कच्च्या मालाला मागणी वाढली. 9 / 10याशिवाय १३ दशलक्ष मेट्रिक टन स्टील आणि १७.७ दशलक्ष मेट्रिक टन सिमेंटचा खप झाला असल्याचे ते म्हणाले. प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत आतापर्यंत १ कोटी १० लाख घरांना मंजुरी देण्यात आली आहे.10 / 10त्यापैकी ४८ लाख घरांचे काम पूर्ण झाले आहे. यासाठी केंद्र सरकारच्या शहरी आवास मंत्रालयाने २४ अब्ज डॉलरची गुंतवणूक करण्याचे ठरवले आहे, असे सांगितले जात आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications